दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक, वाचक बॅंक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - पहिली ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असावेत, यासाठी लेखनिक आणि वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. खास बाब म्हणून प्रौढ लेखनिकांबरोबरच जवळच्या नातेवाइकांनाही लेखनिक व वाचक मुख्याध्यापकांच्या परवानगीने निवडता येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक वाचक मिळण्यासाठी अनेकदा अडचणी निर्माण होत असल्याने तालुका पातळीवर इच्छुकांची लेखनिक व वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. प्रौढ लेखनिक व वाचक हे शाळेतील किंवा अन्य शाळेतील शिक्षक, खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक, विद्यार्थ्याचे जवळचे नातेवाईक नसावेत, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, खास बाब म्हणून जवळच्या नातेवाइकांना लेखनिक व वाचक म्हणून परवानगी देण्याचे अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

लेखनिक, वाचक बॅंकेमध्ये नोंदणीकृत झालेल्यांची माहिती विभागाच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. मात्र, यासाठी निःस्वार्थी भावनेने सेवा देणाऱ्यांचाच सहभाग घ्यावा, यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: handicape scribe for students, readers Bank