पोलिसाकडून महिला पोलिस शिपायावर लैंगिक अत्याचार; पीडितेला मद्यधुंद अवस्थेत मारहाण

अनिश पाटील
Tuesday, 19 January 2021

मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाने महिला पोलिस शिपायाला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई ः मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाने महिला पोलिस शिपायाला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदार महिला पोलिसाने चौकशी केली असता आरोपीचे पूर्वीच लग्न झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका 26 वर्षीय महिला पोलिस शिपायावर पोलिसाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित आणि आरोपी हे दादर परिसरातच राहणारे आहेत. आरोपी हा विवाहित असताना त्याने पीडितेला लग्नाच्या भूलथापा देऊन 2015 पासून शारीरिक संबध ठेवले; मात्र लग्नाबाबत विचारले असता आरोपी टाळाटाळ करीत असल्याने पीडितेला संशय आला. पीडितेने आरोपीची चौकशी केल्यानंतर आरोपीचे लग्न झाल्याचे तिला समजले. याविषयी आरोपीला जाब विचारला असता त्याने पीडितेला मद्यधुंद अवस्थेत मारहाण केली.

harassment of a female police officer by a police constable in mumbai

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harassment of a female police by a police constable in mumbai