#Breaking : हार्बर उपनगरीय सेवा विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

कुर्ला स्थानकात हार्बर मार्गाच्या क्रॉसिंगवर मालगाडी बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. उशिरा सर्व उपनगरीय सेवा ठप्प झाली आहे.

मुंबई ः  कुर्ला स्थानकात हार्बर मार्गाच्या क्रॉसिंगवर मालगाडी बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. उशिरा सर्व उपनगरीय सेवा ठप्प झाली आहे. कुर्ला येथून पनवेल कडे येणाऱ्या उपनगरीय सेवा तसेच पनवेलवरून कुर्ल्याकडे जाणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा विस्कळीत झाली आहे. 

हार्बर रेल्वेच्या वाहतुक खोळंब्यामुळे असंख्य प्रवासी लोकलमध्येच अडकून राहिले. रेल्वे प्रशासनाकडूनही कोणतीही सुचना मिळत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तरी ही सेवा लवकरच सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harbor suburban services disrupted