Vidhan Sabha 2019 : पाच वर्षे वाट पाहिली; आता त्यांनाच उमेदवारी- मुख्यमंत्री

Devendra-In-Sabha
Devendra-In-Sabha

मुंबई : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पाच वर्षे वाट पाहिली. आता त्यांनाच इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.11) म्हटले आहे. 

मी विनाअट भाजपमध्ये- हर्षवर्धन पाटील

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हर्षवर्धन यांचा प्रवेश झाला ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा प्रवेश हा योग्य वेळी झाला आहे. मोठा नेता पक्षात आल्याने बळकटी मिळणार असून विरोधात असतानाही आमचा हर्षवर्धन यांच्याशी संबंध होता. राज्यात त्यांनी जबाबदारीने काम केले असल्याचा निर्वाळाही यावेळी दिला.

 



भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाचे सरकार नक्कीच पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळे इंदापूरवासियांच्या पाण्यापासून सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com