माॅल आणि हाॅटेल बंद ठेऊन सरकार कोविडचा संसर्ग कसा रोखणार ? व्यापाऱ्यांचा सवाल

hotel
hotel sakal media

मुंबई : रस्त्यावरील फेरीवाले (road hawker) दिवसभर खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात. विमान कंपन्यांना (airlines) विमानांमधून प्रवासी नेण्याची परवानगी आहे. मग केवळ मॉल आणि हॉटेल बंद (mall and hotel closed) ठेऊन सरकार कोरोनाचा प्रसार (corona infection) कसा रोखणार आहे, असा प्रश्न त्यांच्या संघटनांनी सरकारला (government) विचारला आहे. (hawker-airlines-mall and hotel closed-corona infection-government-nss91)

अद्यापही मुंबई परिसरात मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. वातानुकुलीत मॉल बंदिस्त असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. तर हॉटेल देखील दुपारी चार वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात आली आहेत. हॉटेलमध्ये बराच काळ लोक मास्क काढून एकत्र खाणेपिणे करतात हे कारण असले तर मग रस्त्यावरील फेरीवाले दिवसभर खाद्यपदार्थ तयार करून तेथेच विकतात हे प्रशासनाला कसे चालते, असा प्रश्न हॉटेलचालकांची संघटना आहार ने विचारला आहे.

hotel
मलाईदारजागी बदली मिळविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पळापळ

तर महाराष्ट्रातील मॉल उघडण्याची मागणी करणाऱ्या रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ने देखील हीच मागणी केली आहे. बंदिस्त वातानुकूल विमानांमधून शे-दोनशे प्रवासी जातात, वातानुकुलीत रेल्वे, लक्झरी बसगाड्या या बंदिस्त वातावरणातूनही प्रवासी जातात, ते सरकारला चालते. मग फक्त बंदिस्त वातानुकुलीत मॉलमधूनच कोरोना फैलावतो हे तर्कशास्त्र सरकारला कोणी सांगितले, असा प्रश्न त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विचारला आहे.

हॉटेलांचा व्यवसाय संध्याकाळनंतरच खऱ्या अर्थाने सुरु होतो व त्या वेळातच तो बंद ठेवल्याने हॉटेल चालविण्याला काहीच अर्थ नाही. आमचे उत्पन्न बंद व खर्च सुरु असा आतबट्ट्याचा व्यवहार सुरु ठेवणेही आम्हाला परवडणार नाही. दुसरीकडे रस्त्यावरील खाद्यविक्रेते दिवसभर व्यवसाय करीत आहेत हे आमच्यासाठी अन्यायकारक आहे, असे आहार च्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर एका मॉलवर पाच हजार लोकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार अवलंबून असून राज्यातील मॉल चाळीस हजार कोटी रुपयांची उलाढाल करतात. हे मॉल चार हजार कोटी रुपयांचा करमहसूल देत असल्याने ते लौकरात लौकर खुले करावेत, अशी मागणीही रिटेलर्स असोसिएशनने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com