esakal | 'इथे दारू का पिता'? विचारल्यावर त्याने चिडून डोक्यावर फोडली बाटली, मग घडलं असं की...
sakal

बोलून बातमी शोधा

'इथे दारू का पिता'? विचारल्यावर त्याने चिडून डोक्यावर फोडली बाटली, मग घडलं असं की...

दारू का पिता, अशी विचारणा केल्याने झालेल्या वादातून एका व्यक्तीवर तलवारीने वार करुन त्याची हत्या करण्यात आली आहे.

'इथे दारू का पिता'? विचारल्यावर त्याने चिडून डोक्यावर फोडली बाटली, मग घडलं असं की...

sakal_logo
By
जीवन तांबे - सकाळ वृ्त्तसेवा

चेंबूर : दारू का पिता, अशी विचारणा केल्याने झालेल्या वादातून एका व्यक्तीवर तलवारीने वार करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. घटनेत जितू गागडा याचा मृत्यू झाला असून आरोपी अक्षय रेवाले याला अटक करण्यात आली आहे. रविवारी (ता. 19) टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बंजारा वस्तीमध्ये ही घटना घडली.

तात्पुरता जामीन मंजूर करा --- अन्यथा कारागृहांमध्ये भयावह स्थिती ओढावेल

रविवारी मृत जितू गागडा व त्याचा मित्र रॉकी पारचा दारू पित होते. त्यावेळी आरोपी अक्षय रेवालेने त्यांना पाहिले असता येथे दारू का पिता, असा सवाल त्यांना केला. त्यायावरून वाद झाला व राॅकीने आरोपी रेवालेवर डोक्यात दारूची बाटली मारल्याने त्यात आरोपीचे डोके फुटले. म्हणून आरोपीने त्याचे इतर साथीदार बोलावले. त्यानंतर अनिकेत घायतिडके, आतिश घायतिडके, संतोष सरदार, अक्षय रेवाले यांनी तलवार व चाकूने वार केल्याने यात जितू गागडा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी आरोपी अक्षय रेवाले याला ताब्यात घेतले असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहोत.

--------------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image
go to top