esakal | प्रसिद्धी प्रमुख आर.आर. पाठक यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसिद्धी प्रमुख आर.आर. पाठक यांचे निधन

चित्रपटांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे आर. आर. पाठक (वय ७६) यांचे आज अंधेरी येथील राहत्या घरी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा राहुल, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

प्रसिद्धी प्रमुख आर.आर. पाठक यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क


मुंबई ः विनोद खन्ना यांची निर्मिती असलेला हिमालय पुत्र, राजेश खन्ना यांची निर्मिती असलेला जय शिव शंकर, डी. रामानायडू यांची निर्मिती असलेला उधार की जिंदगी तसेच राकेश रोशन यांची निर्मितीअसलेल्या कहो ना..प्यार है आणि त्यांच्या अन्य काही चित्रपटांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे आर. आर. पाठक (वय ७६) यांचे आज अंधेरी येथील राहत्या घरी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा राहुल, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

लवकरच प्रभास आणि दीपिकाची जोडी दिसणार मोठ्या पडद्यावर


आर. आर पाठक (राजाराम पाठक) यांना सुरुवातीपासून चित्रपटसृष्टीची कमालीची आवड होती. त्या आवडीमुळेच ते वाराणसीहून मुंबईत आले. चित्रपटाशी संबंधित असलेल्या मासिकांमध्ये तसेच पाक्षिकांमध्ये त्यांनी लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत हळूहळू ओळखी होत गेल्या आणि त्यांनी नितीन मनमोहन, अर्जुन हिंगोरानी, सुधाकर बोकाडे, के. सी. बोकाडिया अशा कित्येक निर्मात्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम पाहिले. राकेश रोशन यांच्या बहुतेक चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम तेच पाहात होते. जवळपास चार दशकांहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. तीनशेहून अधिक चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. कयामत से कयामत तक, फूल और कांटे, हमारा दिल आपके पास है, काश, लफंगे, दिल आशना है, साजन, कोई मिल गया, धरम संकट अशा कित्येक हिंदी चित्रपटांचे तसेच पटली रे पटली हा मराठी  चित्रपटांचे ते प्रसिद्धी प्रमुख होते.  

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top