Health Alert | मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने 'हेल्थ अलर्ट' जारी

Health Alert |  मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने 'हेल्थ अलर्ट' जारी

मुंबई  : मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने "रेड अलर्ट' जारी केला आहे. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. सध्याचे वातावरण आरोग्यासाठी घातक असल्याने भौतिकशास्त्रज्ञ तसेच हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी मुंबईत "हेल्थ अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतील तापमानात वाढ झाली असून, कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोचले आहे. त्यातच हवेची गुणवत्ताही खालावली आहे. आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 नोंदवला गेला आहे. 
मुंबईत प्रदूषण वाढल्याने "रेड अलर्ट' जारी केला आहे. हे वातावरण मानवी आरोग्यासाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले. दमा, अस्थमा, हृदयविकार, मधुमेह आदी रुग्णांसाठी वातावरण घातक घातक असल्याचे प्रा. जोहरे यांनी सांगितले. तसेच लहान मुले, वृद्ध आणि गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईच्या तापमानात झाली वाढ झाली आहे. त्यामुळे हवेचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे धूलिकण जमिनीलगत साचून राहिल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 170 असून, शनिवारी तो 179 नोंदवला गेला. 

सायकलपेक्षा हवेचा वेग कमी 

मुंबईतील हवेचा वेग प्रचंड मंदावला असून, तो सायकलच्या वेगापेक्षाही कमी झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यातच जमीन तापल्याने हवेतील उष्मा वाढला आहे. सध्या मुंबईतील हवेचा वेग हा ताशी पाच किलोमीटरपेक्षाही कमी आहे. 

थंडीचा कडाका वाढणार 

मुंबईत सध्या ढगाळ वातावरण दिसते. आर्द्रता 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. उष्णता धारण करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. सध्या दिल्लीतील किमान तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, ते तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईत थंडीचा कडाका वाढून हुडहुडी भरण्याची शक्‍यता प्रा. किरण कुमार जोहरे यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईची आपत्कालीन परिस्थितीकडे वाटचाल सुरू झाली आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. लोकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. 
- प्रा. किरणकुमार जोहरे ,

हवामान तज्ज्ञ एवम्‌ भौतिकशास्त्रज्ञ 
 

Health Alert Health alert issued due to rising pollution level with temperature in Mumbai

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com