आरोग्योत्सव! लालबाग गणेशोत्सव मंडळांच्या शिबिरात दुप्पट प्लाझ्मा दान; 246 कोरोनामुक्त भक्तांचा शिबिराला प्रतिसाद

आरोग्योत्सव! लालबाग गणेशोत्सव मंडळांच्या शिबिरात दुप्पट प्लाझ्मा दान; 246 कोरोनामुक्त भक्तांचा शिबिराला प्रतिसाद


मुंबई: यंदा गणेशोत्सव काळात विविध गणेशमंडळानी रक्तदान, प्लाझा दान अशी शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांना मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी आणि कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित "आरोग्यत्सव" 4 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत शिबिर आयोजित केलं होतं. त्या आरोग्यत्सवात आता पर्यंत 246 प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मा दान केलंय. या सर्व प्लाझ्मादात्यांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला. तर, अखेरच्या दिवशी 10 हजार 100 हून अधिक लोकांनी रक्तदान केले आहे. 

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी जीवनदायी ठरत असुन त्यातून अनेक रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे, कोरोनामुक्त रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार, लालबाग गणेशोत्सव मंडळाने सुरु केलेल्या आरोग्योत्सवाला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल 125 कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान केला होता. ती संख्या आता दुप्पट होऊन आजपर्यंत 245 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव ऐवजी आरोग्योस्तव साजरा करण्याचा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आला. या आरोग्योत्सवाला पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. 

15 जून 2020 रोजी हिंदुस्थान आणि चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात हिंदुस्थानचे 22 वीरजवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह आणि प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले. कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र आणि मुंबईतील 111 पोलिसबांधव शहीद झाले. त्यापैकी आतापर्यंत एकूण 101 शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह आणि प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कोव्हिड सेनानींचा सन्मान-

कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सव काळात करण्यात आला आहे. मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या घातक प्रादुर्भावाच्या काळात 23 मार्च ते 1 एप्रिल 2020 या कालावधीत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 4 मे ते 4 जून 2020 या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळजवळ 29 हजार नागरीकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले होते.

गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर

भायखळा पश्चिम येथील सुंदर गल्ली समोरील शिवनेरी बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात युवकांनी गर्दी केली होती. या उस्फुर्त प्रतिसादाने भारावलेले मंडळाचे अध्यक्ष सैनिकराव यांनी दरवर्षी अशाच प्रकारे समाजपयोगी उपक्रम राबवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि जीवनदान असल्याची सांगत गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांचे स्वागत करत होते. तर, लवकरात लवकर कोरोना संकट निघून जावे, असे आवाहनही शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले. हे रक्तदान शिबिरी शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर जे.जे. महानगर रक्तपेढी यांच्या वतीने रविवारी घेण्यात आले होते.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com