esakal | प्लाझ्मानंतर सीटीस्कॅनचे दर ही निश्चित, दोन ते तीन हजार रुपयांत सीटीस्कॅन
sakal

बोलून बातमी शोधा

ct_scan.

प्लाझ्मानंतर सीटीस्कॅनचे दर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. सीटीस्कॅनसाठी आता यापुढे दोन ते तीन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

प्लाझ्मानंतर सीटीस्कॅनचे दर ही निश्चित, दोन ते तीन हजार रुपयांत सीटीस्कॅन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : प्लाझ्मानंतर सीटीस्कॅनचे दर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. सीटीस्कॅनसाठी आता यापुढे दोन ते तीन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

खासगी रुग्णालयात किंवा तपासणी केंद्रांकडून सीटीस्कॅनसाठी अवाजवी दर आकारण्याबाबतच्या अनेक तक्रारी नातेवाईक आणि लोक प्रतिनिधींकडून समोर आल्या होत्या. सरकारने याची दखल घेत सीटीस्कॅनच्या दर निश्चितीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या समितीने सादर केलेला अहवाल सरकारने मान्य करत 16 स्लाईडपेक्षा कमी सीटीस्कॅनसाठी 2500 रुपये तर 64 स्लाईडपेक्षा जास्त असणाऱ्या सीटीस्कॅनसाठी 3000 रुपये आकारले जातील. यापेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्यावर कारवाईचा इशारा ही टोपे यांनी दिला आहे.

एवढा दर कशासाठी ? 

या रकमेत तपासणी अहवाल, डिसइन्फेकटनट, पीपीई किट्स, सीटी फिल्म, सॅनिटायझेशन, जीएसटी यांचा समावेश आहे. हे दर नियमित आणि तातडीच्या तपासणीसाठी समान असून आदेश निघाल्यापासून लागू होतील. तपासणी अहवालात कोणत्या सीटीस्कॅनद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक आहे. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा आहे किंवा रुग्णालय, काॅर्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू होणार नाहीत. 

प्रिस्क्रिप्शनशिवाय तपासणी नाही

सद्यस्थितीत कोणत्याही डाॅक्टराच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सीटीस्कॅन करण्याची मागणी केली जात आहे. तपासणी करणाऱ्या रेडिओलाॅजिस्टने संपूर्ण अहवाल देणे गरजेचे आहे. निश्चित दरापेक्षा जास्त दर आकारले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी सांगितले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image