आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये धाडी, टोपेंना आढळलं असं काही की थेट पाठवली नोटीस...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये धाडी, टोपेंना आढळलं असं काही की थेट पाठवली नोटीस...
Updated on

मुंबई - मुंबईत कोरोनाचं थैमान पाहायला मिळतंय. अशात मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून, त्यांच्या नातेवाईकांकडून बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येताना पाहायला मिळतायत. एकीकडे राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीयेत. सातत्याने रुग्णालयांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येतायत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयावर धाडी टाकल्यात आणि याबाबत स्वतः दखल घेतली. काल रात्री रात्री १० वाजता राजेश टोपे यांनी धाडी मारण्यास मारण्यास सुरवात केली. सकाळी २ वाजेपर्यंत राजेश टोपे यांचं धाडसत्र सुरु होतं.  

रात्री राजेश टोपे यांनी मुंबईतील बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लिलावती या चार रुग्णालयांमध्ये धाड टाकत परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईतील रुग्णालयांमध्ये भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांना 'या' काही बाबींमध्ये त्रुटी आढळून आल्यात.  

काय आढळलं राजेश तपे यांना:  

  • रुग्णालयांमध्ये रिकाम्या बेड्सची माहिती देणारे बोर्ड लावण्यात आलेले नाही 
  • रुग्णालयांमध्ये रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराच्या फी बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही 
  • अनेक बेड रिकामे असूनही रुग्णांना दाखल करून न घेणं

रुग्णालयांनी त्या रुग्णालयात असलेल्या बेड्सची अचूक संख्या फलकावर लावावी असे निर्देश सरकारकडून देण्यात आलेत. याच सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या चारही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.  राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही नोटीस दिलीये.

जनतेला लवकरात लवकर कोरोनावर उपचार उपलब्ध व्हावेत तसेच नॉन कोविड  रुग्णांना पटकन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी सरकारकडून ८० टक्के खाटा ताब्यात घेण्यात आल्यात. या सोबतच सरकार कडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचाराचा देखील निर्णय घेतला आहे. 

health minister rajesh tope visits private hospitals in mumbai send notice to four hospitals

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com