महिलांनो,आरोग्याकडे लक्ष द्या; जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढतेय

महिलांनो,आरोग्याकडे लक्ष द्या; जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढतेय

मुंबई: महिलांना हृदयसंबंधित आजार होण्‍याचे प्रमाण जवळपास 29 टक्‍के आहे. 72 टक्‍के महिला हाडांच्‍या आजारांनी त्रस्‍त आहेत.  तर 87 टक्‍के महिलांमध्‍ये जीवनसत्त्व ड ची कमतरता आहे. इंडस हेल्‍थ प्‍लसने केलेल्‍या तपासण्‍यांमधून हे भीतीदायक चित्र दिसून आले असून महिलांनी आपल्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन ही करण्यात आले आहे.
 
जनुके, शरीररचना आणि हार्मोन पातळ्यांमधील फरकामुळे काही आजार पुरूषांपेक्षा महिलांना अधिक होतात. काही आरोग्‍यविषयक आजारांचा महिलांवर अधिक प्रमाणात परिणाम होतो. अनेक महिलांचे आरोग्‍यविषयक आजारासंदर्भात निदान होत नाही. महिलांना  स्‍तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, रजोनिवृत्ती आणि प्रसूतीकाळ यांसारख्या अनेक आरोग्‍यविषयक आजारांचा सामना करावा लागतो. पुरूषांच्‍या तुलनेत महिलांचे हृदयाघातामुळे अधिक मृत्‍यू होतात. महिला रूग्‍णांमध्‍ये वारंवार नैराश्‍य आणि चिंता दिसून येते. यूरिनरी ट्रॅक्‍ट आजार अधिककरून महिलांमध्‍ये दिसून येतात आणि लैंगिक संक्रमिक आजारांचा महिलांना अधिक त्रास होऊ शकतो असेही स्पष्ट झाले आहे. 

या अभ्यासासाठी 10 हजार व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यात आली. ज्‍यापैकी 4093 महिला होत्‍या. या तपासणी अहवालातून  निदर्शनास आले की, 17 टक्‍के महिला थायरॉईड आजाराने पीडित आहे, तर पुरूषांमध्‍ये हे प्रमाण 9 टक्‍के आहे. 16 टक्‍के महिलांना यूरिन संसर्गाचा त्रास आहे,  पुरूषांमध्‍ये हे प्रमाण 6 टक्‍के आहे. 6 टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत 32 टक्‍के महिलांना अँनेमिया आहे. 72 टक्‍के महिला हाडांच्‍या आजारांपासून पीडित होत्‍या, तर 87 टक्‍के महिलांमध्‍ये जीवनसत्त्व ड कमतरता होती. 27 टक्‍के महिलांच्‍या पॅप स्‍मीअर रिपोर्टमध्‍ये काही अँब्‍नॉर्मलिटी असल्‍याचे आढळून आले.

पॅप स्‍मीअर ही गर्भाशयाचा कर्करोगाचे निदान करणारी स्क्रिनिंग चाचणी आहे. यातून 20 टक्‍के महिलांच्‍या सोनोमॅमोग्राफी रिपोर्ट्समधून आजारांची निष्‍पत्ती झाली. महिलांमध्‍ये हृदयविषयक आजारांचे प्रमाण जवळपास 29 टक्‍के होते आणि अब्‍नॉर्मल फास्टिंग शुगर पातळ्यांचा जवळपास 40 टक्‍के महिलांमध्‍ये परिणाम दिसून आला. 

हा अभ्यास आपल्‍या समाजातील महिलांच्‍या आरोग्‍य स्थितीबाबत माहिती देतो आणि यामधून स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते की, महिलांच्‍या आरोग्‍याकडे गांभीर्याने लक्ष देण्‍याची गरज आहे असे इंडस हेल्‍थ प्‍लसच्‍या प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट कांचन नायकवडी यांनी सांगितले. महिलांनी पौष्टिक संतुलित आहाराचे सेवन, पुरेसा प्रमाणात हायड्रेटेड आणि शारीरिकदृष्‍या सक्रिय राहण्‍याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. त्‍यांनी त्‍यांचे मानसिक आणि सायकोलॉजिकल आरोग्‍याकडे लक्ष दिले पाहिजे असे ही नायकवडी पुढे म्हणाल्या.

 
उत्तम आरोग्यासाठी अशी काळजी घ्या

धूम्रपान करू नका. 
आरोग्‍यदायी आहार सेवन करा.
आरोग्‍यदायी वजन राखा. 
नियमित व्‍यायाम करा. 
मद्यपान टाळा. 
तणाव कमी करा. 
अनुवांशिक पूर्वस्थिती / प्रवृत्तींची माहिती ठेवा.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Health story Women deficient in vitamin D Women are urged take care their health

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com