बोर्डी परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी जनजीवन विस्कळीत

झाई खाडी तसेच परिसरातील तलाव तुडुंब भरल्याने सर्वत्र महापुराचे स्वरूप आले.
heavy rain
heavy rainsakal

बोर्डी : परिसरात मंगळवारी पहाटे झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन ठप्प पडले. नदी- नाल्याला महापूर आला आहे वहिंद्रा खडीपासुन थेट खूट खाडी पर्यंत पाच किलोमीटरच्या परिसरात रस्त्यावर पाणी पाणी साचले आहे. बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील धोंड्य पाडा येथील सुमारे 60 घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे कपडे धान्य भिडल्याने प्रचंड नुकसान झाले; तर टोकेपाडा  मारवाड भागात पाणी भरल्याने अनेक लोकांचे नुकसान झाले आहे.

रात्री एक वाजता पासून पावसाला सुरुवात झाली चार वाजता प्रचंड ढगफुटी होऊन पावसाने रौद्र रूप धारण केले. सतत विजांचा गडगडाट व ढगचा कडकडाट सुरू असून, वहिंद्रा खाडी खूट खाडी टोके पाडा खाडी झाई खाडी तसेच परिसरातील तलाव तुडुंब भरल्याने सर्वत्र महापुराचे स्वरूप आले. रस्त्यावर पाणी भरल्यामुळे ठिकाणी वाहने अडकून पडली. तसेच सकाळच्या वेळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना आज सक्तीची सुट्टी घ्यावी लागली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतीची कामे बंद पडली असून, मोबाईल नेटवर्क देखील शाश्वत कार्यरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

heavy rain
Dahi handi 2021 : डोंबिवलीत मनसे मवाळ

सकाळच्या वेळी दुग्ध व्यवसाय तसेच भाजीपाला विक्रेत्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मच्छीमारांना ही मोठा फटका रात्रभर सुरू असलेल्या पावसाने मच्छिमारांची झोप उडवली. वहिंद्रा आणि झाई खाडीला एकाच वेळी महापूर आल्याने नांगरून ठेवलेल्या नौका पुरामध्ये वाहून जाऊ नये म्हणून मच्छिमार रात्रभर जीवाचे रान करीत आहे. जोरदार पाऊस ढगांचा कडकडाट आणि विजांचा गडगडाट अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन मच्छिमारांनी रात्र जागून काढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com