का आहेत पुढचे चार दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मुंबईसह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडलाय. गेले काही दिवस मुंबईत पाऊस जरी पडत नसला तरीही आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्यात.

मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडलाय. गेले काही दिवस मुंबईत पाऊस जरी पडत नसला तरीही आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्यात. दरम्यान आता पुन्हा मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली गेलीये. येत्या चार दिवसात मुंबईवर मोठ्या पावसाचं सावट आहे. 

स्कायमेटच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात त्याचबरोबर लगतच्या मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुंबईकरांनो पुढचे चार दिवस विना छत्री किंवा रेनकोट बाहेर पडू नका.

पुढचे चार दिवस पाऊस 

मुंबईतून मान्सूनचा परतीचा प्रवास हा साधारण 7 ऑक्टोबरला सुरु होतो. दरम्यान, यंदा मान्सूनचा प्रवास आठवडाभर जास्त रेंगाळला होता. त्यामुळे मुंबईतून 14 तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालाय. 

 

 

मुंबईसोबत आणखी कुठे पाऊस :

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर पाऊस पडण्याची शक्यता वारातावली जातेय. पश्चिम किनारपट्टी सोबतच पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्येही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान मुंबईपेक्षा पुणे आणि नाशकात कमी पावसाचा अंदाज आहे.  

दरम्यान, मुंबातील पावसामुळे तापमानात घट होणार असून ऑक्टोबर हीटमुळे होणारी उन्हाची काहिली काही अंशी कमी होणार आहे. 

मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. यावर मुंबईकरांनी सोशल मिडीयावर आपल्या भवान्या व्यक्त केल्यात. 

 

     

WebTitle : heavy rain expected in mumbai for next four days 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain expected in mumbai for next four days