मनोर : पालघर तालुक्याच्या पूर्व भागात मंगळवारी दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने उसंत घेतली होती, जनजीवन पूर्वपदावर येत असताना घाट माथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मनोर लगतच्या देहरजा, हात आणि वैतरणा नद्यांना पूर आले होते. पुराच्या पाण्यामुळे मनोर पालघर महामार्ग पाण्याखाली गेल्याने मनोर शहराचा संपर्क तुटला आहे. दरम्यान मनोर लगतच्या तिन्ही नद्या धोका पातळीवर वाहत आहेत.