pandhartara bridge under flood water
sakal
विरार - जूनच्या शेवटच्या आठवड्या पासून सुरु झालेल्या पावसाने आता जोर धरला आहे. वसईत पावसाने अधिकच जोर धरल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वसई पूर्वेतून वाहणाऱ्या तानसा व वैतरणा नद्यांनी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात केली असून यंदाच्या हंगामात प्रथमच दोन्ही नद्यांनी किनारे गाठले आहेत. त्यामुळे नदीपात्रातून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा रौद्र अवतार पाहायला मिळत होता.