Bhandara Hospital Fire| 'फायर ऑडीट' साठी खासगी कंपन्यांची मदत घेतली जाणार 

मिलिंद तांबे
Friday, 22 January 2021

भंडारा आग दुर्घटनेमुळे रुग्णालयीन अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा फोलपणा ठळकपणे समोर आला आहे.

मुंबई  ; भंडारा आग दुर्घटनेमुळे रुग्णालयीन अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा फोलपणा ठळकपणे समोर आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणा  सक्षम करण्याच्या शिफारसी चौकशी समितीने केल्या आहेत. रुग्णालयाचे फायर ऑडीट करण्यासाठी  दोन नोंदणीकृत  खासगी आणि सामाजिक संस्थेची मदत घेतली जाणार आहे.  फायर ऑडीटच्या माध्यमातून समोर आलेल्या उणीवा दूर केल्या जाणार आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत (बुधवारी ) या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. अग्निशमन यंत्रणाच्या उणीवा आणि रुग्णालय प्रशासनाकडून दाखवलेल्या हलगर्जीपणावर या बैठकीत बोट ठेवण्यात आले होते. 

भंडारा बेबी केअर यूनीटमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर राज्यातील सर्व 448 शासकीय रुग्णालय, प्रथमिक केंद्राच्या फायर ऑडीटला सुरुवातही झाली. यामध्ये अर्ध्याअधिक रुग्णालयात फायर ब्रिगेडचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याची बाब समोर आली आहे. चौकशी समितीने भविष्यात या प्रकारच्या आगी टाळण्यासाठी अनेक महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत.  भंडारा अग्निशमन दलात अनेक पदेच रिक्त होती, आग विझवतांना जवानांना लागणारी महत्वाची उपकरणे जवानांकडे नव्हती. असे चौकशी समितीच्या अहवालातातून समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक अग्निशमन दलातील रिक्त पदांचा बँकलॉग भरुन काढण्यापासून  ते अग्निशमन उपकरणे उपलब्ध करण्यापर्यंतच्या  महत्वाच्या शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

चौकशी समितीच्या महत्वाच्या शिफारसी 

1. रुग्णालयाचे फायर ऑडीट करुन घेऊन, त्यातील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेतील उणीवा दूर करणे 

2. भंडारा अग्निशमन दलाच्या जवानांना वेळोवेळी अद्यावत प्रशिक्षण देण्याची गरज

3.  आग विझवतांना आवश्यक असलेली महत्वाची उपकरणांची अग्निशमन दलाकडे कमतरता आहे, ही तातडीने भरुन काढावी 

4. महाराष्ट्र अग्निशमन यंत्रणेची राज्यात दिडशेच्या वर  पदे रिकामी आहेत. ती पदे तातडीने भरण्याची आवश्यकता 

5. रुग्णालयात अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा नीट सुरु आहे का याच्या तपासणीसाठी नियमित मॉक ड्रिल घ्यावेत.

काय उणीवा आढळल्या 

1. फायर इस्टिंग्यूशर वगळता अन्य आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात नव्हत्या 

2. रुग्णालयाचे फायर ऑडीट झाले नव्हते, तसेच विद्युत यंत्रणाचे ऑडीटही शंकास्पद 

3. रुग्णालयात फायर लिफ्ट नव्हत्या, रुग्णालयाच्या बांधकाम मंजूर करतांना, फायर ब्रिगेडची मंजूरी नव्हती

4.  आग लागली तेव्हा यूनीटमध्ये एकही कर्मचारी उपस्थित नव्हता
 

The help of private companies will be sought for fire audit of bhandara hospital fire

---------------------------------------------  

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The help of private companies will be sought for fire audit of bhandara hospital fire