
आज महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची शपथविधीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एक गमतीशीर प्रसंग घडला, ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. भाजपचे कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने विरोधी बाकावर बसले होते. मात्र, तिथेच अजित पवार यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून योग्य बाकावर बसवले.