हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शुक्रवार पासून मुंबईत बरसायला सुरूवात झाली आहे. शुक्रवारपासून सुरु असलेला पाऊस शनिवारीही बरसत आहे. सकाळीच हिंदमाता आणि किंग्जसर्कलचा परीसर जलमय झाला असून आज दिवसभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शुक्रवार पासून मुंबईत बरसायला सुरूवात झाली आहे. शुक्रवारपासून सुरु असलेला पाऊस शनिवारीही बरसत आहे. सकाळीच हिंदमाता आणि किंग्जसर्कलचा परीसर जलमय झाला असून आज दिवसभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज (ता.7) वेधशाळेने रेड अलर्ट जारी केला असून काही भागात 200 मि.मी पेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे.तर अरबी समुद्रावरही पावसाळी ढग दाटून आले आहेत.

नायर रुग्णालयातून आली सर्वात मोठी गोड बातमी, वाचा सविस्तर

सकाळ पासून अंधेरी, मरोळ,विक्रोळी या परीसरात जोरदार पाऊस सुरु आहे.या भागात गेल्या तीन तासात 40 मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.तर इतर भागातही पावसाची रिपरीप सुरु असून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहे. पावसाच्या कोसळणाऱ्या सरींचा अंदाज पाहता मुंबई परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहरासह नवी मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाढदिवसाची पार्टी म्हणून बोलावले परंतु गुंगीचे औषध पाजून चौघांनी केले दुष्कृत्य...

समुद्रात येणार 4.57 मीटरची मोठी लाट

आज दुपारी 12 वाजे दरम्यान अरबी समुद्रात 4.57 मीटर एवढी मोठी लाट येणार असल्याची माहिती हवामाना खात्याने दिली आहे. यामुळे समुद्रात 15 फुटापर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळण्यासोबतच मुंबईत तुफान पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेन बंद असल्याने 'मरे'ने प्रवाशांना दिला तब्बल एवढ्या कोटींचा परतावा

शुक्रवारी एकाच दिवसात शहरात 156 मिमी पावसाची नोंद

शुक्रवारी मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊसाची नोंद झाली. त्यांमुळे अनेक भागात पाणी तुंबल्याची माहिती समोर आली होती. परंतु आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तसेच कोरोनाचा धोका पाहता मुंबईकर घरातच राहणे पसंत करणार आहेत. हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

कोकणामध्ये पुढील आठवडाभर चांगला पाऊस पडणार आहे. तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यांवरही पाऊस होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांमध्येही मुसळाधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high alert for rains in mumbaihigh tide can cause waves up to 15 feet in the ocean