Parambir singh | फरार...! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरार...! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का?

फरार...! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का?

sakal_logo
By
ओमकार वाबळे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 'फरार' घोषित करणारा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर चिकटवण्यात आला आहे.

सचिन वाझे प्रकरणात निलंबन झाल्यानंतर परमबीर सिंगांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले. या प्रकरणानंतर गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर हा संपूर्ण लढा न्यायालयात सुरू आहे. मात्र, अनिल देशमुखांवर आरोप करून परमबीर सिंग कुठे गायब आहेत, याची कोणालाही माहिती नाही.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्याविरोधात वॉरंट काढलं. त्यांची शोधाशोध सुरू आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या एकाही पत्त्यावर ने सापडले नसल्याने त्यांना फरार घोषित करण्याची मागणी गुन्हे शाखेने केली होती. असं झाल्यास येणाऱ्या काळात परमबीर सिंगांची संपत्ती जप्त करण्यासाठी कारवाई करणं, सोपं जाणार आहे. कोर्टानेही मुंबई पोलिसांच्या बाजूने निकाल दिला.

दरम्यान, परमबीर सिंगांनी त्यांच्या वकिलांमार्फत ते देशाबाहेर न गेलेले नसल्याची माहिती दिली. तसेच गुन्हे शाखेपासून जीवाला धोका असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सध्या तात्पुरता कोर्टाने सिंग यांना दिलासा दिला आहे. आणि तत्काळ अटक होण्यापासून संरक्षणही दिलंय. मात्र, त्यांच्या जूहू या ठिकाणच्या घरावर न्यायालयाची नोटीस चिटकवण्यात आली आहे.

loading image
go to top