मुंबई : कायद्याचे उल्लंघन करून डहाणूतील रस्ता रुंदीकरणासाठी ७५९ झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आल्याच्या आरोपाची उच्च न्यायालयाने नुकतीच दखल घेतली. तसेच याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी स्थानिक अधिकाऱ्यांच्या निर्णयावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून झाडे तोडण्यास पुन्हा एकदा नकार दिला.