esakal | हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी लादणे थांबवा; मराठी एकीकरण समितीचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Kalyan strike

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी लादणे थांबवा; मराठी एकीकरण समितीचा निषेध

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस (Hindi day) म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही राष्ट्रभाषा (National language) असल्याची अफवा (rumors) पसरवली जाते. मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, होणार ही नाही, हिंदी लादणे थांबवा अशा घोषणा देत मंगळवारी मराठी एकीकरण समितीने (Marathi Samiti) कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर (kalyan railway station) निषेध आंदोलन (strike) करण्यात आले.

हेही वाचा: वसई: बाप्पासोबत साडेपाच तोळ्याचा सोन्याच्या मूकूटाचे विसर्जन,पण...

हिंदी दिनाला विरोध म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण डोंबिवली विभागाच्या वतीने हिंदी ही कायद्याने राष्ट्रभाषा नाही म्हणून जनजागृती करण्यात आली. संपूर्ण देशात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशी अफवा पसरविले जाते. मात्र याचा अभ्यास केला तर कायद्यात कुठेही तसा उल्लेख नाही. हिंदी भाषा दिन साजरा करून हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा निषेध आज समितीच्या वतीने नोंदविण्यात आला. हिंदी लादणे थांबवा तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असे फलक घेऊन यावेळी जनजागृती करण्यात आली. यावेळी कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश तिखंडे, विलास चव्हाण, प्रशांत यांसह समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही पण मराठी ही राज्यभाषा आहे हे सांगण्याच्या दृष्टिकोनाने आज आम्ही हिंदी भाषेविषयी मराठी एकीकरण समितीतर्फे निषेध नोंदवत आहे असे मत कल्याण डोंबिवली अध्यक्ष गणेश तिखंडे यांनी सांगितले. शाळेत मुलांना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगितले जाते. मराठी या मातृभाषेला पर्याय म्हणून ती भाषा आली पाहिजे असेही शिकविले जाते. ही अफवा थांबणे आवश्यक असून हिंदी भाषे विषयी असलेली अफवा थांबली पाहिजे असे मत समितीचे कल्याण शहर समन्वयक भूषण पवार यांनी सांगितले.

loading image
go to top