हिंदू नेत्याच्या हत्येचं कारस्थान, तिघांना सक्तमजुरीची सजा

लष्कर ए तैयबाच्या तीन हस्तक
terrorist organization
terrorist organization

मुंबई: देशातील हिंदू नेत्यांची हत्या (hindu leader assassination plan) करण्याचे कारस्थान रचणाऱ्या पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना लष्कर ए तैयबाच्या तीन हस्तकांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची सजा मंगळवारी सुनावली. (hindu leader assassination plan three accused imprisonment for ten years)

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने सन 2012 मध्ये पाचजणांना नांदेडमधून अटक केली होते. नंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. विशेष न्या डी ई कोथळीकर यांनी आरोपी मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुझमिल आणि मोहम्मद सादीक यांना यांना दहशतवाद प्रतिबंधक कायदा आणि हत्यारे कायद्यात दोषी जाहीर केले. तसेच सबळ पुराव्याअभावी आरोपी मोहम्मद इरफान आणि आरोपी मोहम्मद इलियाज यांची निर्दोष सुटका केली.

terrorist organization
लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत धक्कादायक खुलासा

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, अक्रम नोकरी मिळविण्याच्या हेतूने सौदी अरेबियामध्ये गेला होता. तिथे लष्कर ए तोयबाच्या अनेक म्होरक्यांबरोबर त्याच्या ओळखी झाल्या. त्यातूनच रियाधमध्ये त्यांनी देशातील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट आखला होता. याद्वारे देशात अशांतता आणि दंगल निर्माण करण्याचा आरोपींचा कट होता. यामध्ये नांदेड, हैदराबाद आणि बंगळुरू येथील ठिकाणामध्ये असलेल्या काही जणांचा समावेश होता. मात्र दहशतवाद विरोधी पथकाने हा कट अमंलात येण्याआधीच यशस्वीपणे उधळला आणि पाचहीजणांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com