2017 हिंगोली खून दंगल प्रकरण: आरोपी पोलीस हवालदार बडतर्फ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

2017 साली हिंगोली जिल्ह्यात झालेल्या खून आणि दंगल प्रकरणी विभागीय चौकशीला सामोरे जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या दोन पोलिस हवालदारांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

2017 हिंगोली खून दंगल प्रकरण: आरोपी पोलीस हवालदार बडतर्फ

मुंबई - 2017 साली हिंगोली जिल्ह्यात झालेल्या खून आणि दंगल प्रकरणी विभागीय चौकशीला सामोरे जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या दोन पोलिस हवालदारांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 2017 सालच्य घटनेत एकाचा मृत्यू झाला होता तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. श्याम महादेव कुरील आणि त्याचा चुलत भाऊ तुळजेश फकीरचंद कुरील अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. कॉन्स्टेबल श्याम कुरील हे मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागाच्या ताडदेव विभागात तैनात होते तर कॉन्स्टेबल तुळजेश किरील हे कलिना येथील सशस्त्र पोलिस प्रशिक्षण विभागात तैनात होते.

काय आहे प्रकरण

17 ऑगस्ट 2017 रोजी हिंगोली जिल्ह्यातील रोहिदास चौक परिसरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. ही घटना दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावरून घडली होती आणि आरोपी पोलिस हे एकाच गटातील होते ज्यांनी विरुद्ध गटाच्या सदस्यांवर तलवारी आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. विजय कुरील यानो केलेल्या तक्रारीनतर दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, परिसरात दहीहंडी आयोजित करण्याच्या मुद्द्यावरून सुमारे नऊ मद्यधुंद लोकांच्या गटाने त्याचा चुलत भावाला शिवीगाळ केली. विजयने त्यांच्या चुलत भावाला शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता, गटातील एकाने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर रॉड, बांबूच्या काठ्यानी वार केले.

विजयचे चार भाऊ आणि इतर काही जण मदतीसाठी घटनास्थळी धावले, पण तोपर्यंत विरुद्ध गटातून आणखी नऊ जण घटनास्थळी पोहोचले. या नऊ जणांमध्ये रजेवर हिंगोलीत गेलेल्या मुंबई पोलिसातील हवालदार श्याम कुरील आणि तुळजेश कुरील यांचा समावेश आहे. विजय, त्याचा भाऊ जीतूवर श्याम तुळजेश आणि अन्य १६ जणांनी प्राणघातक शस्त्रांनी वार केले. जीतूचा त्याच दिवशी रुग्णालयात मृत्यू झाला. हिंगोली शहर पोलिसांनी सर्व आरोपींना खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आदी गुन्ह्याखाली अटक केली होती, तेव्हापासून हे दोन्ही पोलीस विभागीय चौकशीसाठी निलंबित होते.