
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई ताल्युक्यात 72 कृत्रिम फिरते तलावाची व्यवस्था केली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय 'तलाव आपल्या घरी' ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
नालासोपारा - कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी अथवा विसर्जनस्थळावर गणेशभक्तांची गर्दी होऊ नये यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई ताल्युक्यात 72 कृत्रिम फिरते तलावाची व्यवस्था केली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय 'तलाव आपल्या घरी' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी कृत्रिम फिरते तलाव वाहनांवर सज्ज झाले आहेत. नोंदणी केलेल्या गणेशभक्तांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचे विसर्जन करणार असल्याची बविआचे सचिव आजीव पाटील यांनी 'सकाळ' ला दिली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 1134 कोरोनाबाधितांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी
वसई विरार नालासोपारा परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा 15600 च्या पार केला आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि गणेशभक्तांच्या सुविधेसाठी 72 कृत्रिम फिरत्या तलावाची सुविधा केली आहे. हे सर्व कृत्रिम फिरते तलाव हे 3 चाकी, 4 चाकी वाहनांना वर असणार आहेत. ज्यांच्या घरात माणस कमी आहेत, आर्थिक अडचण आहे. कोणतेही साधन नाही पण त्यांना त्यांच्या गणेशाचे विसर्जन तलावात करायचे आहे अशा गणेश भक्तांनी संपर्क केल्यास कार्यकर्ते स्वतःहून श्रींची मुर्ती तलावात विसर्जन करणार आहेत.
वसई ताल्युक्यातील सर्व गणेश भक्तांनी बाहेर गर्दी टाळण्यासाठी तेथील संबधित बविआच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून अधिकची माहिती घेता येईल असे बविआकडून सांगण्यात आले आहे.