Eknath Shinde Meeting With Amit Shah : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स संपला असला तरी गृहमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. अशातच शपथविधी सोहळ्यानंतर गृहमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीनंतरतरी हा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.