सर्वात मोठा दावा; कोरोनावर होमियोपॅथीचे उपचार गुणकारी, गोळ्यांचं नाव आहे...

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 25 April 2020

होमियोपॅथी उपचार पद्धती कोविड 19 आजारावर  गुणकारी असल्याचा दावा अंधेरीतील पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी केला आहे.

मुंबई , ता. 25 : होमियोपॅथी उपचार पद्धती कोविड 19 आजारावर  गुणकारी असल्याचा दावा अंधेरीतील पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सेंट्रल कौन्सिल ऑफ होमियोपॅथी विभागाला पत्र लिहुन या उपचार पद्धतीचा वापर करण्याची परवानगी मागितली आहे. 

लक्षात ठेवा : 3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल

होमियोपॅथी औषध असलेल्या 'झिंकम म्युरिअटिकम 200 सी' या गोळ्या कोविड -19 बधितांसाठी गुणकारी असल्याचे डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला दिवसातून 3 वेळा 4 गोळ्या दिल्यानंतर रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती वाढत असून रुग्ण लवकर बरा होत असल्याचा त्यांचा निष्कर्ष आहे. शिवाय गोळ्यांचा रुग्णावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह असलेले रुग्णदेखील या गोळ्या घेऊ शकतात, असे ते म्हणाले. 

कोविड 19 आजारावर अद्याप ठोस औषध सापडलेले नाही. त्यामुळे बाधित रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच अँटीबायोटिक्स म्हणून काही ठिकाणी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांचादेखील प्रयोग करण्यात आला. मात्र या गोळ्या दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना देता येत नसल्याने होमियोपॅथी उपचार पद्धती कोविड 19 रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे जोशी यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी - आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

रुग्णांचा उत्तम प्रतिसाद

पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या 24 रुग्णांवर या गोळ्यांच्या माध्यमातून उपचार करून प्रयोग करण्यात आला आहे. हे रुग्ण इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उपचार पद्धती कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपयुक्त ठरल्याचे डॉ. जोशी ह्यांचे म्हणणे आहे.

homeopathy can cure covid19 patients with zincum muriaticum 200 c tablets 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: homeopathy can cure covid19 patients with zincum muriaticum 200 c tablets