तिसऱ्या दिवशीही होमिओपॅथी डॉक्टरांची सरकारकडून दखल नाही

हर्षदा परब
बुधवार, 4 एप्रिल 2018

होमिओपॅथी डॉक्टरांनी यावेळी आयएमएच्या विरोधात घोषणा दिल्या. सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास आयएमए आणि होमिओपॅथी डॉक्टरांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबई : उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही होमोओपॅथी डॉक्टरांच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही. आंदोलन तीव्र करत होमिओपॅथी डॉक्टरांनी काढलेली रॅली देखील पोलिसांनी रोखली.

अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यासाठी ब्रिजकोर्सच्या हवा यासाठी होमिओपॅथी डॉक्टर तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने डॉक्टरांनी आंदोलन तीव्र करत मार्चचा पर्याय निवडला. बुधवारी सकाळी जे. जे. रुग्णालय ते आझाद मैदान असा मार्च काढण्यात आला. यावेळी नही चलेगी नही चलेगी आयएमए की दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी जे. जे. रुग्णालयाच्या गेटवरच रॅली अडवली. याचा प्रतिकार करण्यासाठी डॉक्टर रस्त्यावर झोपले. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांना पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंडून आझाद मैदान येथे आणून सोडले अशी माहिती होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉ. प्रकाश राणे यांनी दिली. 

होमिओपॅथी डॉक्टरांनी यावेळी आयएमएच्या विरोधात घोषणा दिल्या. सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास आयएमए आणि होमिओपॅथी डॉक्टरांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Web Title: Homeopathy doctors strike in Mumbai

टॅग्स