साकीब गोरे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

honor for sakib gore
honor for sakib gore

उल्हासनगर : लहानपणी एका अंध म्हातारीला मरताना बघितल्यावर 1992 सालापासून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका खुदाच्या बंद्याने 26 वर्षात उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तब्बल पावणेआठ लाख आदिवासींच्या डोळ्यांना दृष्टी देण्याचं काम केले आहे. या बंद्याचे नाव साकीब गोरे असून त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन या बंद्याला शाबासकी दिण्यात आली.

साकीब गोरे हे अवघे 13 वर्षांचे असताना ते त्यांच्या आईसोबत मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या एका आदिवासी गरीब वयोवृद्ध महिलेला बघायला गेले होते. तिचे निधन झाले. बाई तू मरेपर्यंत काहीच बघू शकली नाही ही तिच्या नातलगांच्या आवाजातील वेदना साकीबच्या कानावर येत होत्या. त्याने आईला विचारल्यावर लहानपणीच तिच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. गरीब असल्याने आणि त्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने तिच्या नशिबी कायमचेच अंधत्व आले. डोळ्यांअभावी तिला निसर्ग आणि कुठलाच आनंद लुटता आला नाही असे सांगितले. 
बदलापूरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या साकीबच्या ही बाब जिव्हारी लागली.

मी जेंव्हा सक्षम होणार तेंव्हा ज्या गरीब आदिवासीला मोतीबिंदूचा त्रास असेल त्यांची मोफत शस्रक्रिया करून त्यांच्या डोळ्यांना दृष्टी देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार. अशी शपथच साकीबने घेतली. साकीबने रेती व्यवसायात पाऊल टाकले. बरकत मिळू लागली. या बरकतीतून 20 टक्के रक्कम विशेषतः आदिवासींच्या डोळ्यांना दृष्टी मिळावी या उद्देशाने बाजूला जमा करण्यात आली. आणि 1992 साली ठराविक आदिवासींच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्रक्रिया केल्यावर आणि त्यांना दिसू लागल्यावर साकीबला आणखीनच प्रेरणा मिळाली. तेंव्हापासून आजपर्यंत कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कर्जत या ग्रामीण भागातील तब्बल 1 हजार 217 खेड्या पाड्यातील 7 लाख 81 हजार 356 मोतीबिंदूने ग्रासलेल्या आदिवासींच्या डोळ्यांना दृष्टी देण्याचं काम साकीब गोरे या खुदाच्या बंद्याने केले.

शस्रक्रिया झालेल्या आदिवासींना बिर्याणीची मेजवानी

दरवर्षी आदिवासी खेड्या पाड्यात साकीबच्या गाड्या जातात. मोतीबिंदू असणाऱ्या नागरिकांना गाडीत बसवून उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणले जाते. शस्रक्रिया झाल्यावर त्यांना पाच दिवस ठेवण्यात येते. डोळ्यांवरील पट्या काढल्यावर आणि त्यांना दिसू लागल्यावर पोट भरेपर्यंत बिर्याणीची मेजवानी आदिवासींना दिली जाते. आणि गाडीतून त्यांना त्यांच्या गावात सोडण्यात येते. हा साकीब गोरे यांचा दरवर्षीचा नित्यक्रम झालेला आहे.

लंडनच्या मेयर कडूनही साकीबचा गौरव

14 एप्रिल 2018 मध्ये लंडन मधील डॉ. आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देशातील चार नामचीन व्यक्तिमत्वाचा महापौर यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन गौरव केला होता. त्यात पदमश्री महिला उद्योजक कल्पना सरोज, गौतम चक्रवर्ती, संतोष दास आणि साकीब गोरे यांचाही समावेश होता. भाजपा आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक असणाऱ्या साकीब गोरे यांच्या कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कौतुक केलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com