esakal | #HopeOfLife : पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग!
sakal

बोलून बातमी शोधा

#HopeOfLife : पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग!

पुरुषांतील प्रजनन प्रणालीवर थेट परिणाम करणारा एक महत्त्वाचा आजार म्हणजे पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग होय.

#HopeOfLife : पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुरुषांतील प्रजनन प्रणालीवर थेट परिणाम करणारा एक महत्त्वाचा आजार म्हणजे पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग होय. शारीरिक संबंधाच्या वेळी विर्यातील शुक्राणू सहजपणे योनीमार्गातून पुढे जावेत, यासाठी पुरःस्थ ग्रंथीतून द्रवपदार्थ स्रवला जातो. या आजारात पुरःस्थ ग्रंथीमध्ये कर्करोगाच्या पेशी वाढून त्याचा प्रजनन प्रणाली आणि मूत्रविसर्जन प्रणालीवर परिणाम होतो. जगातील पुरुषांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांत पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कर्करोगामुळे दरवर्षी जगभरात जवळपास अडीच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या कर्करोगाचे प्रमाण पूर्वी कमी होते, मात्र जीवनशैलीच्या समस्यांमुळे त्याचे रुग्ण आढळू लागले आहेत. 
----- 
लक्षणे
- ओटीपोटातील वेदना 
- वारंवार लघुशंका लागणे 
- लघुशंकेवेळी वेदना होणे, रक्तस्त्राव होणे 
- वीर्यपतनावेळी वेदना होणे 
- पाठदुखी, कंबरदुखी, मांडीत तीव्र वेदना 
- सांधेदुखी 
- वजन कमी होणे 

---------------- 
कारणीभूत घटक ः 
पुरःस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र काही जनुकीय आणि अनुवांशिक घटकांमुळे हा कर्करोग होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

त्यातील महत्त्वाचे घटक ः 
- वय ः वाढत्या वयासोबतच या कर्करोगाचे प्रमाणही वाढते. बहुतांश रुग्णांचे वय सामान्यतः 50 च्या पुढे आहे. 
- अनुवांशिकता ः मूत्रशयासंबंधी आजारांची पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये हा आजार होण्याची शक्‍यता जास्त आहे. 
- अन्नघटक ः आहारात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यास पुरःस्थ ग्रंथींचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. 
- स्थूलपणा ः स्थूलपणाचा आणि पुरःस्थ ग्रंथीतील विकारांचा नजीकचा संबंध आहे. 
----- 
भारतातील आकडेवारी (स्त्रोत : ग्लोबोकॉन; सन 2008) 
नव्या रुग्णांची नोंद ः 25,696 
त्यातील मृत्यू ः 17,184 
--- 
मुंबईतील आकडेवारी (स्त्रोत : मुंबई कॅन्सर रजिस्ट्री) 

वर्ष रुग्णांची नोंद मृत्यू 
2014 520 267 
2015 573 269 
     
loading image
go to top