palghar hospital dispute
sakal
पालघर - पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमधील राडा प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोविंदा पथकातील तब्बल १२ जणांना अटक केली आहे. या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.