रुग्णालय अग्निकांडातील मृतांच्या वारसांना 10 लाख

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना एक लाखाची मदत केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे.

सोमवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला; तर 142 जण जखमी झाले. रुग्णालयाच्या अग्निकांडाची दखल घेत फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना दिली आहे. दुर्घटनेतील जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून जखमींची विचारपूस केली.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत राज्य कामगार विमा रुग्णालय योजनेच्या महासंचालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. कोणत्याही आस्थापनेत अशा प्रकारची घटना घडली तर त्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या प्रमुखावर असते. त्यामुळे या प्रकरणात चौकशीची गरज नसून थेट गुन्हा दाखल करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospital Fire death people heritor 10 lakh Devendra Fadnavis