बापरे! मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; 'हे' आहे कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची २४ तासांमध्ये विल्हेवाट लावण्याचा नियम आहे. मात्र  नातेवाईक पुढे येत नसल्याने अनेक मृतदेह  पडून राहत आहे.  

बापरे! मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; 'हे' आहे कारण..

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची २४ तासांमध्ये विल्हेवाट लावण्याचा नियम आहे. मात्र  नातेवाईक पुढे येत नसल्याने अनेक मृतदेह  पडून राहत आहे.  मृतदेहांची विल्हेवाट वेळीच लागत नसल्याने शवागृहातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत आतापर्यंत ६८४८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृतदेह अर्ध्या तासात वॉर्डात शवागृहातील आणि शवागृहातून २४ तासांच्या आतमध्ये अंतिम संस्कारासाठी पाठवण्याचा नियम आहे.

हेही वाचा: घरकामगार, प्लंबर यांना ईमारतीत प्रवेश मिळण्याबाबत सूचना द्या; हाऊसिंग फेडरेशनची सहकारमंत्र्यांकडे मागणी

परंतु, अनेक रुग्णांचे नातेवाईक क्वारंटाईनमध्ये असल्याने तसेच काही नातेवाईक पुढे यायलाच तयार नाहीत. त्यामळे वेळेत मृतदेहाची विल्हेवाट लावणे प्रशासनाला शक्य होत नसल्याने  मृतदेह शवागृहात पडून राहत आहेत.  

त्यामुळे अनेक कामगारांना कोरोना संसर्ग होत आहे. केईएम रुग्णालयाच्या शवागारातील १२ पैकी १० कामगारांना कोविडची बाधा झालेली असून कस्तुरबा, शीव, नायर, राजावाडी आदी शवागृहातील कामगारांनाही कोविडची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे, निकृष्ट दर्जाचे बॉडी बॅग्ज वापरले जात असल्यानेच हा धोका निर्माण होत असल्याचा आरोपही केला जातो आहे. 

हेही वाचा: "गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. 

मृतांचे नातेवाईक पुढे येत नसल्याने हे शव पडून राहत असून या शवांची विल्हेवाट नियोजित वेळेत केल्यास कामगारांच्या जिविताचा धोका टळू शकेल, असे कामगार संघटनांनी म्हटले आहे.
hospital workers are in danger due to corona mortal remains 

Web Title: Hospital Workers Are Danger Due Corona Mortal Remains

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top