हाॅटेल सुरू, मात्र ग्राहकांचा पत्ताच नाही; आंतरराष्ट्रीय व स्थानिक पर्यटन थंडावल्याने फटका

भाग्यश्री भुवड
रविवार, 2 ऑगस्ट 2020

 राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत प्रतिबंध झोनबाहेरील हाॅटेलांना गेस्ट हाऊस आणि लॉजसह अन्य सुविधा सुरू करण्यास 8 जुलैपासून परवानगी दिली

मुंबई :  राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत प्रतिबंध झोनबाहेरील हाॅटेलांना गेस्ट हाऊस आणि लॉजसह अन्य सुविधा सुरू करण्यास 8 जुलैपासून परवानगी दिली. मात्र, महिनाभरानंतरही ग्राहकांचा पत्ता नसल्याने व्यापारी चिंतेत आहे. राज्यात आतापर्यंत केवळ 10 टक्के ग्राहकांनीच  हाॅटेलसाठी नोंद केल्याचे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरडब्ल्यूआय) चे अध्यक्ष गुरबक्षिश सिंह कोहली यांनी सांगितले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण! भाजप आमदाराने उपस्थित केले नवे प्रश्न; पोलिस उपायुक्तांना लिहिले पत्र

सध्या देश तसेच राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध पुन्हा कठोर करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरदेशीय तसेच, आंतराष्ट्रीय पर्यटन थंडावलेलेच आहे. बहुतांश आस्थापनांना हाॅटेल सेवा सुरू करून 10 टक्केही फायदा झालेला नाही. हॉटेल्स पूर्णपणे बंद झाल्यावर 3 ते 4 महिने मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते पुन्हा उघडण्यासाठी बहुतेकांनी तयारी दर्शवली. हाॅटेलमध्ये सर्व सुविधा देण्यासाठी खर्च करावा लागतो.  मात्र, ग्राहकांचा प्रतिसादच मिळत नसल्याने व्यापाऱ्यांसाठी हा तोट्याचा सौदा ठरत आहे, असे कोहली यांनी सांगितले. पर्यटन वाढल्यानंतरच हाॅटेल व्यवसाय पुर्वपदावर येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले आहे. लाॅकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशी नाहीत. आवश्यकतेशिवाय स्थानिक यात्रा करणे टाळत आहे. कॉर्पोरेट्सकडून किंवा लग्नासाठीही बुकिंग झालेली नाही. या सर्वाचा मोठा फटका हॉटेल व्यवसायांना बसत आहे. 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील काही हॉटेल्समध्ये काही ग्राहक येत आहेत. पण, त्यांना सुविधा देण्यासाठी खर्चही खुप येत आहे आहे. जोपर्यंत देशांतर्गत पर्यटनसुरु होत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. त्यामुळे, सरकारने देशांतर्गत हॉटेल्स पुर्णपणे खुले करण्याची परवानगी द्यावी. 
- शिवानंद शेट्टी,
अध्यक्ष, इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (एएएचएआर)

------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hotel continues, but the customer is not addressed; International and local tourism hit hard