मुंबईकडे असलेला लसीचा साठा किती दिवस पुरेल?

मुंबईकडे असलेला लसीचा साठा किती दिवस पुरेल?

सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: राज्यात कोरोनावरील लसीचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद ठेवावं लागतंय आणि आलेल्या नागरिकांना परत पाठवावं लागतंय. केंद्राने सांगितलं त्यानुसार महाराष्ट्राने आणि मुंबईने लसीकरणाची गती वाढवली. पण आता लसीकरणाच्या गतीने लस पुरवठाही होणं महत्त्वाचं असून त्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही यासंबंधी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सध्या नक्की किती लससाठा शिल्लक आहे? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या मुंबईत फक्त एक किंवा दीड दिवस पुरेल एवढा साठा असून राज्यात किमान तीन दिवस लसीकरण होऊ शकेल एवढाच साठा शिल्लक आहे.

मुंबईत जास्तीत जास्त एक किंवा दिड दिवसांचा लसीचा साठा शिल्लक असून आज 25 हजार कुप्या उपलब्ध होणार होत्या. पण, मुंबईत सध्या 50 हजारांच्यावर लसीकरण केले जाते. त्यामुळे हा साठा फक्त अर्धा दिवस पुरू शकेल असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. 120 लसीकरण केंद्रापैकी काही ठिकाणी अगदी थोडाच लसीचा साठा आहे तर काही ठिकाणी अजिबातच साठा शिल्लक नाही. त्यामुळे एकूण लसीचा साठा पाहता किमान एक ते दीड दिवस पुरेल एवढा साठा सध्या मुंबईकडे आहे. शिवाय, अजून 25 हजार डोस आज उपलब्ध झाले आहेत. आता लसीकरणाचा वेग वाढण्यास सुरुवात झाली आहे पण लसीचा साठा पुरेसा नसल्याने लसीकरण कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रांवरुन परत पाठवण्यात आले आहे. सांताक्रूझ येथील एका खासगी रुग्णालयात लस उपलब्ध ज्येष्ठ नागरिकांना परत पाठवण्यात आले. लस उपलब्ध नसल्याने चार दिवसांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करुन या.
- अनंत कणेरी, सांताक्रूझ

लसीकरण केंद्रावर पुरेसे लसीचे डोस उपलब्ध नसल्याने अनेकांना पुन्हा परत पाठवण्यात येत आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असं मी म्हणणार नाही पण त्याचा आणखी वेग वाढवता येईल. तसंच, 20 ते 40 वयोगटातील जनतेला प्राधान्यानं लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे. 

राज्यात लसीचा तुटवडा असणे ही गंभीर आणि दुर्देवी बाब आहे. सध्या कोरोना प्रतिबंधावर सरकारी आणि खासगी रुग्णालये जी काही राबवत आहेत. लसीकरणाचा जो वेग पकडला आहे त्या वेगाला लसीच्या तुटवड्याने खोडा नक्की बसू शकतो. लसच मिळाली नाही तर लोकांची लसीकरणावरून आवड कमी होऊ शकतो. यातून लसीकरणाला ब्रेक पडू शकतो. केंद्र सरकारने लसीची उपलब्धता करून दिलीच पाहिजे. तसेच दुसऱ्या डोससाठी ही लसीचा पुरवठा केलाच पाहिजे. सध्या जवळपास तीन दिवसांत पुरेल एवढी लस उपलब्ध असून सहव्याधी रुग्णांकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे.
-डॉ. सुभाष साळुंखे, राज्य कोविड सल्लागार

(संपादन - विराज भागवत) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com