TC ने पकडल्यानंतर समोर आली प्रेमची मन सुन्न करणारी व्यथा

खात्यात फक्त ४०० रुपये, तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली व्यथा
प्रेम सरोसे
प्रेम सरोसे

मुंबई: मागच्या आठवड्यात मुंबई लेव्हल एकमध्ये होती, तरीही मुंबई महापालिकेने लेव्हल तीनमध्येच मुंबईला ठेवलं. त्यामुळे दुकानदारांना दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवता आली नाहीत. खरंतर लोकल (Mumbai local) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. पण अजूनही मुंबई लोकल सुरु झालेली नाही. आता महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस (delta plus) व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या (corona) या नव्या व्हेरिंएटचा प्रसार होईल, या भीतीपोटी राज्य सरकारने पहिल्या दोन लेव्हल बंद केल्या आहेत. (How mumbaikars are suffering because travel from local trains are not allowed to comman public)

त्यामुळे लोकल लवकर सुरु होण्याची शक्यता दिसत नाही. लोकलमधून फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. लोकल सुरु केली, तर कोरोना पसरेल, या समजापोटी लोकल बंद ठेवण्याचा अतिरेक केला जातोय. त्यामुळे सर्वसामान्यांचे कसे हाल, गैरसोय होतेय, त्याचं एक उदहारण समोर आलय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओ मधल्या तरुणाचं नाव आहे, प्रेम सरोसे.

प्रेम सरोसे
चिमुकल्या तुलसीची शिक्षणासाठी धडपड; फळं विकून पूर्ण केलं स्वप्न

कल्याणमधील वरप येथे राहणारा प्रेम तब्बल दोन वर्षानंतर एका कंपनीत नोकरीला लागला. दोन वर्षापासून कोरोनामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. यात त्याची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. दीड-पावणेदोन वर्षानंतर अखेर त्याला नोकरी लागली. नवीन नोकरी असल्याने त्याला ट्रेन प्रवास करणं भाग होतं. पहिल्यादिवशी टीसीची नजर चुकवून त्याने प्रवास केला. पण दुसऱ्यादिवशी ऑफिसला जात असताना, प्रेम टीसीच्या हाती लागला.

प्रेम सरोसे
मुंबई: कॉलेजचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना लागला पॉर्न व्हिडीओ

टीसीने पकडल्यावर प्रेम दंड भरायला तयार होता. त्याने आपली खरी परिस्थिती टीसीला सांगितली. टीसी पुढील कारवाईसाठी त्याला अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घेऊन जात असताना, त्याने एक व्हिडिओ बनवून आपली परिस्थिती सांगितली. बँकेत केवळ चारशे रुपये आणि तब्बल दीड वर्षांनी मिळालेली नवीन नोकरी आणि परिस्थिती त्याने आपल्या व्हिडिओतून बोलून दाखवली. ही परिस्थिती केवळ प्रेमची नाहीये तर राज्यातील अनेक तरुणांची आहे.

अनेक तरुण आज नोकरी, व्यवसायासाठी नियम मोडून अशा प्रकारे प्रवास करतायत. मुंबई लोकलमध्ये गर्दी दिसते. त्यातल्या बहुतांश लोक विनातिकिट असतात. लोकांना तिकिट काढून प्रवास करायचा आहे. पण सरकारने लोकल सेवाच बंद ठेवल्यामुळे लोकांवर आज विनातिकिट प्रवास करायची वेळ ओढवली आहे.

प्रेम सरोदे म्हणाला...

कल्याणच्या वरप गावामध्ये राहणाऱ्या प्रेम सरोदेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंजिनियर असलेल्या प्रेमला नुकतीच नोकरी लागलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल बोलताना प्रेम म्हणाला की, "गेल्या दीड वर्षांपासून मी बरोजगार होतो. मला नवीन नोकरी लागलीय. नोकरीसाठी माणूस सर्वकाही करु शकतो. २४ जून २०२१ ला मी हा व्हिडिओ बनवला. परेल स्टेशनवर उतरल्यानंतर तिकिट नसल्यामुळे टीसीने मला पकडलं. माझ्याकडे दंड भरण्याइतके पैसे नाहीयत, हे मी त्यांना सांगितलं. त्यांना माझ्या बँक खात्याचे डिटेल्स दाखवले."

"दंड कमी होऊ शकतो का? म्हणून मी विचारणा केली. त्यावर टीसींनी नकार दिला. अखेर मी दंडाची सर्व रक्कम भरण्याची तयारी दाखवली. पण मला व्हिडिओ बनवायचा आहे, हे मी त्यांना सांगितलं. टीसींनी फक्त मला सहकार्य केलं. बाकी अधिकाऱ्यांनी नकार दिला. एखादी व्यक्ती दिवसाला ५०० रुपये कमवत असेल आणि त्यातले ३०० ते ३५० रुपये दंड भरण्यामध्ये जाणार असतील, तर १५० रुपयांचा काय उपयोग आहे?" असा सवाल त्याने विचारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com