"भारतात खास लोकांना मॉडर्नाची लस कशी काय मिळते?"

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा केंद्र सरकारला सवाल
PM-Modi-Nawab-Malik
PM-Modi-Nawab-MalikSakal Media
Summary

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई: भारतात (India) सध्या विविध राज्यात कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin), सीरमची कोव्हिशिल्ड (Covishield) आणि रशियाच्या स्फुटनिक व्ही (Sputnik V) या तीनच लसींना अद्याप परवानगी (Permission) देण्यात आली आहे. असं असताना मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात आणि विशेषकरून फ्रान्स दुतावासातील (France) नागरिकांना मॉर्डनाची (Moderna) लस दिली जात असल्याचे समजले आहे. भारतात केवळ काही खास लोकांनाच मॉडर्नाची लस कशी काय मिळते आहे? त्यासाठी काही विशेष परवानगी देण्यात आली आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. (How special people in India getting Moderna Vaccine doses when its not permitted asks NCP Minister Nawab Malik to Modi Govt)

PM-Modi-Nawab-Malik
विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं...

"फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना भारताच्या फ्रान्स दुतावासात असणाऱ्या नागरिकांना मॉडर्नाची (Moderna Vaccine) लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही, मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा", अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. "देशात लस तुटवडा असल्याचे केंद्र सरकार सांगतेय. केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्ट्यिट्यूट व स्फुटनिकला परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे", अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

"विशेषतः फ्रान्स या देशातील नागरीक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना Moderna ची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील नागरीकांचे भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे. तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जाते", असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com