पावसाळ्यात कशी घ्याल आपल्या त्वचेची काळजी? वाचा अत्यंत महत्वाची माहिती

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 जुलै 2020

मुंबईमध्ये अखेर पावसाला सुरुवात झाल्याने उकाड्याच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका झाली आहे. मात्र पावसाळा म्हटलंकी अनेक आजार डोकं वर काढतात. त्यातच सततच्या ओलाव्यामुळे अनेकांना त्वचेच्या त्रासालाही सामोरे जावे लागते.

मुंबई : मुंबईमध्ये अखेर पावसाला सुरुवात झाल्याने उकाड्याच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका झाली आहे. मात्र पावसाळा म्हटलंकी अनेक आजार डोकं वर काढतात. त्यातच सततच्या ओलाव्यामुळे अनेकांना त्वचेच्या त्रासालाही सामोरे जावे लागते.

वाचा - 'राजगृह' तोडफोड प्रकरणः राष्ट्रवादीकडून निषेध, आक्रमक पवित्रा घेत केली 'ही' मागणी

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो आणि त्यामुळे त्वचाविकार होतात. तसेच पावसात चिखलाच्या पाण्यातून चालल्यामुळे पायालाही अनेक संसर्ग होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्ती पाण्यात अधिक वेळ राहतात त्यांचे  पाय ओलसर असल्याने त्यांना संसर्गजन्य त्वचा-रोगांची लागण लवकर होते. यात त्वचेला खाज येणे, त्वचा लाल पडणे किंवा त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुले घरगुती उपायांसह डाँक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास या समस्यांवर मात करता येऊ शकते.

वाचा - मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! धारावीतून आली दिलासादायक बातमी...

अशी घ्या त्वचेची काळजी-

  • घरातील कुंड्यांमध्ये झाडे ठेवण्याचे टाळा, कारण यामुळे अलर्जी होऊ शकते
  • पाळीव प्राण्यांच्या जवळ जास्त जाणे टाळा
  • आपली त्वचा हायड्रेट करण्यासाटी आंघोळीनंतर एखादे चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम लावू शकता.
  • आपल्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी निरोगी संतुलित आहार घ्या
  • जास्त वेळ ओले कपडे परिधान करू नका.
  • ओल्या चपला वापरू नयेत, यामुळे पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो.
  • बाहेरून आल्यावर लगेच आंघोळ करा. हातापायाची नखे कापावीत, त्यात माती अडकल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.

 

जर तुम्हाला गंभीर पुरळ उठत असेल. तर लवकरात लवकर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण घरगुती उपाय किंवा औषध विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारची क्रिम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावणे घातक ठरु शकते. काही क्रिम्समध्ये ‘स्टिरॉइड्स’ असल्याने त्वचेची समस्या आणखी वाढू शकते. -

डॉ. मधुलिका म्हात्रे, त्वचाविकार तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to take care of your skin in the rain? Read very important information