esakal | महाराष्ट्रातल्या 'त्या' नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? हायकोर्टाचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

महाराष्ट्रातल्या 'त्या' नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली?

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला घरी जाऊन लस देण्याच्या मुद्यावरुन आज मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) सुनावणी सुरु आहे. न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मागच्या सुनावणीच्यावेळी या नेत्याला घरी जाऊन लस (vaccine at home) कोणी दिली होती? असा सवाल राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला विचारला होता. (How that leader get vaccine at home mumbai high court questions govt)

केंद्र सरकार घरोघरी जाऊन लसीकरणाला तयार नाहीय आणि बीएमसी त्यांच्या परवानगीची वाट पाहतेय. मग या नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता.

हेही वाचा: 'भातखळकर जरा शांत घ्या', मॅनहोल्सवरुन महापौरांची शाब्दिक चकमक

आज मुंबई महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अनिल साखरे यांनी सांगितले की, या नेत्याला मुंबई महापालिकेने घरी जाऊन लस दिलेली नाही. त्यानंतर मग राज्य सरकारला विचारलं की, लस कोणी दिली? याचा खुलासा करण्यासाठी राज्य सरकारने आठवड्याचा अवधी मागून घेतला.

हेही वाचा: लस घेतल्यानंतर चुंबकत्व येतं का? तात्याराव लहाने म्हणतात...

मात्र ही मुदत मागितल्यानंतर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. लस कोणी दिली हे विचारण्यासाठी आठवडा लागतो का? असा खोचक सवाल खंडपीठाने केला. ध्रुती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी घरोघरी जाऊन लसीकरण सुरु करावे, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेत्याला घरी जाऊन लस देण्याचा मुद्दा उपस्थित झाला.