
अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या
रत्नागिरी : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाजारात थंडगार फळांचाही प्रवेश झाला आहे. यासोबचत फळांचा राजा आंब्यानेही बाजारात एंट्री केली आहे. तसं आंबाप्रेमी आणि हापूस हे मिळतं जुळतं गणित. कोकणातला हापूस आणि महाराष्ट्र हे वेगळ नातं. हापूसचा कितीही दर वाढला असला तरी लोकांकडून त्याची मागणी कमी होत नाही. संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूनही याला जास्त मागणी आहे. मग यामध्ये देवगड हापूस असेल, रत्नागिरी हापूस असेल असे अनेक प्रकार मोडतात. अगदी हजारो रुपयांत विकला जाणारा हापूस सर्वांना चाखायला हवाच असतो.
मात्र अलीकडे गेली काही वर्ष हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत आहे. देवगड, रत्नागिरी हापूस म्हणून ग्राहकाला प्रलोभने देत त्यांची लुबाडणूक केली जात आहे. यंदाचा हापूस हंगाम थोडा उशिरा सुरू झाला. वातावरणातील बदलामुळे यंदा उत्पादनही कमी झाले आहे. परिणामी बागायतदारांना याचा फटका बसत आहे. असे असले तरी रत्नागिरी आणि देवगडहून दररोज वीस हजार पेक्षा जास्त आंबा बाजारात विक्रीसाठी येतो. सातशे ते आठशे रुपये दराने विकला जात आहे.
गेल्या वर्षी हा दर जास्त होता. यंदा मात्र पेटीला हजार ते दोन हजार रुपये घेतले जात आहेत. मात्र बाजारपेठेत हापूस खरेदी करताना ग्राहक गडबडून जातात. बाजाराच आंबा खरेदीला गेलेल्या ग्राहकाला शंभर टक्के प्युअर असणारा रत्नागिरी किंवा देवगड हापूस ओळखायचा तरी कसा किंवा त्याची खरेदी करताना तो ओळखावा कसा? हा प्रश्न ग्राहकांसमोर असतो. जर तुम्ही हापूस खरेदी करणार असाल तर या काही टॅक्ट्स नक्की लक्षात ठेवा.
असा ओळखा हापूस..
हापूस ओळखनं अगदी सोपं आहे. तुम्हाला जर हापूस खरेदी करताना कोकणचा हापूस घ्यायचा असेल तर तो आतून केशरी रंगाचा असतो. त्याची साल पातळ असते. शिवाय त्याचा बॉटलग्रीन कलर असतो. आपण चित्रात पाहतो तशा आकाराचा हापूस आंबा मार्केटमध्ये ओरिजनल हापूस म्हणून विकला जातो. मात्र इतर राज्यातून येणारा आंबा बाहेरून बेलग्रीन आणि आतून बेलयेलो म्हणजे पिवळ्या कलरचा असतो. हा हापूस तुलनेत जास्त रसाळ असतो आणि त्याचा आकार थोडासा उभट असतो. त्यामुळे ग्राहकांनी आतून केशरी आणि पूर्णतः बॉटलग्रीन असाच आंबा विकत घ्यावा. जो ओरिजिनल हापूस आंबा म्हणून विकला जातो. याशिवाय तुम्ही हापूस ज्या मार्केटमधून किंवा ज्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करणार आहात, त्याच्याकडे हापूस खरेदी केलेल्या भौगोलिक प्रदेशात एखादे प्रमाणपत्र आहे का याची विचारपूसही करु शकता. विक्रीशी संबंधित कागदपत्रे असतील तशी विचारपूस करु शकता. अशी दस्तऐवज ज्या व्यापाराकडे आहेत त्याच व्यापाराकडे तुम्हाला ओरिजनल हापूस आंबा मिळेल. म्हणजे तुम्ही ओरीजनल हापूसची चव चाखू शकता.
"कोकणातील पाच जिल्ह्यातील आंब्याला हापूस जी आय मानांकन मिळाले आहे. हापूस आतून केशरी आणि त्याचे साल पातळ असते. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा जातो. इतर राज्यातील आंबा हा बाहेरून हिरवा तर आतून पिवळा असतो. थोडा रसाळ आणि त्याचा आकार उभट असतो. या बाप बाबी तपासूनच ग्राहकांनी हापूस विकत घ्यावा."
- आनंद देसाई, बागायतदार
संपादन - धनाजी सुर्वे
Web Title: How To Identify Original Alphonso Mango
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..