अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे बारावीचे निकाल लांबणीवर

Hsc result
Hsc resultsakal media

मुंबई : बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीचे (HSC Exam ) नियोजन, वेळापत्रक, त्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) या मागील आठवड्यापासून तयार आहेत. मात्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये (Senior Authorities in Education Filed) सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे त्या कार्यपद्धतीचे नियोजन अद्याप जाहीर होऊ न शकल्याने बारावीचा निकाल (HSC Result) लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ( HSC Results on waiting due to Education Authorities internal issues)

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीचे धोरण हे मागील आठवड्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) तयार करण्यात आले आहे. त्याचा सविस्तर अहवाल शिक्षण विभागाकडून मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपूर्वी ते जाहीर करून त्यासाठीचा कार्यक्रम आणि निकालाचे वेळापत्रक सुरू होणे अपेक्षित होते, परंतु शिक्षण मंडळातील काही अधिकाऱ्यांमध्ये या धोरणासोबत सीईटी परीक्षा कोण घ्यावी, यावरून हेवेदावे निर्माण झाल्याने बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन संदर्भातील कार्यपद्धतीचे धोरण मंत्रालयात अडकले असल्याची माहिती शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून देण्यात आली.

Hsc result
खळबळजनक! मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा

बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. बारावीचा निकाल कसा जाहीर करायचा, याबाबत अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे यावर अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. यातच सर्वोच्च न्यायालयाने बारावीचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लकवर मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, निकालाचे सूत्र जाहीर केल्यानंतर किमान 30 ते 45दिवस निकाल आणि त्यांच्या कामकाजाला लागतील. त्यामुळे निकाल उशीर झाल्यास आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, आणि त्यासोबत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा होतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com