esakal | VIDEO: अलिबागमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: अलिबागमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला आहे

VIDEO: अलिबागमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग: मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वाढत आहे. 17 मिमीच्या सरासरीने जिल्ह्यात मागील 24तासात पाऊस पडला असून माथेरान (34), पेण (,38) कर्जत(29), अलिबाग(27) या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाबरोबरच वर्याचाही वेग वाढत आहे. 

अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत पुन्हा ट्विस्ट; राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली नवी सूचना

चक्रीवादळाच्या पार्श्व भूमीवर नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. निसर्ग चक्रीवादळ अलीबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने येथे एन डी आर एफ च्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवरील भागात जास्त सतर्कता बाळगण्यात येत आहे. वाऱ्याचा वेग सध्या  तासी 30 किलोमीटर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात येत आहे. हा वेग 100 किलोमीटर पेक्षही जास्त वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  पावसाचे आणि वर्याचेही प्रमाण हळूहळू वाढत असल्याने येथील नागरिकांमध्ये वादळाची भीती वाढू लागली आहे.

loading image
go to top