esakal | बायकोला म्हणालेला "माझा फोन कुणी तरी ओढतंय ग", बास पोलिसांसाठी यावरूनच लावला छडा...
sakal

बोलून बातमी शोधा

बायकोला म्हणालेला "माझा फोन कुणी तरी ओढतंय ग", बास पोलिसांसाठी यावरूनच लावला छडा...

बायकोला म्हणालेला "माझा फोन कुणी तरी ओढतंय ग", बास पोलिसांसाठी यावरूनच लावला छडा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - २३ फेब्रुवारीला रात्री १२ च्या सुमारास पश्चिम द्रुतगती मार्गावर एक व्यक्ति जखमी अवस्थेत आढळली अशी माहिती दहिसर पोलिसांना मिळाली होती. मात्र या व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा खून आहे असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. आता अवघ्या ३० तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपीला बेड्या घातल्या आहेत.

हेही वाचा: दगाफटका टाळण्यासाठी भाजपने उचलले पाऊल
 
अशोक मौर्य वय वर्ष ३७ असं या मृत व्यक्तिचं नाव आहे. आपला फोन कोणीतरी खेचत असल्याचं त्यांनी पत्नीशी फोनवर बोलताना शेवटच्या क्षणी सांगितलं होतं. डायमंड कटिंगसाठी वापरली जाणारी काच आणि मौर्य यांच्या फोन कॉल रेकॉर्डवरुन पोलिसांनी आरोपीला शोधलं. दहिसर पोलिसांनी अवघ्या ३० तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

नक्की काय घडलं होतं:
 
३७ वर्षांचे अशोक मौर्य हे पोलिसांना पश्चिम द्रुतगती मार्गावर जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. द्रुतगती मार्गावर उभे राहून फोनवर बोलत असताना आरोपी बिंदु शर्मा तिथे आला. मद्यपान केल्यानंतर आरोपी अशोक मौर्यांकडील मोबाईल आणि पैसे हिसकावत होता. त्यावेळी मौर्य हे आपल्या पत्नीशी फोनवर बोलत होते. त्यावेळी आपला फोन कोणीतरी हिसकावत आहे असं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. यानंतर आरोपी आणि मौर्य यांच्यात झटापट सुरु झाली. मात्र त्यांनी विरोध केल्यामुळे अखेर बिंदूनं मौर्य यांची दगडानं ठेचून हत्या केली. याच माहितीचा धागा पकडून पोलिसांनी ३७ वर्षांच्या आरोपी बिंदू शर्माला थेट उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून उचललं.

CCTV रेकॉर्डिंग आणि त्यांच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांना आरोपी कानपूरला पळून गेला आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी ३० तासांच्या आत आरोपीला कानपूरवरुन अटक केली आणि मुंबईला आणलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. 

Husband informed his wife about snatching of his phone before his murder

loading image
go to top