
मी अत्यंत साध्या घरातून आलेली मुलगी आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने माझ्यासोबत लोकांची साथ कायम साथ राहिली आहे.
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्याबाबत अनेक प्रश्न साठले होते. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे द्यायला आज उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. कोविड काळात पत्रकार परिषदेला मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधी उपस्थित राहिल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी आभार मानलेत.
मी अत्यंत सध्या घरातून आलेली मुलगी
मी अत्यंत साध्या घरातून आलेली मुलगी आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने माझ्यासोबत लोकांची साथ कायम साथ राहिली आहे. मी मीडिया मेड स्टार नाही तर मी पब्लिक मेड स्टार आहे. आज मी अजून एक अवघड वाटचालीस सुरवात केली आहे. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम करताना मी पीपल मेड स्टार बनली तशीच मी आताही पीपल मेड राजकारणी बनणे पसंत करेन, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात.
एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात १४ तासात गेलेली नाही
आज उर्मिला यांना काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात की, "मी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात १४ तासात गेलेली नाही. मी आज १४ माहित्यानंतर पक्ष बदलला आहे, १४ तासात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे वेगळं असतं.
महाविकास आघाडीने गेल्या वर्षात चांगलं काम केलं
गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून केल्या गेलेल्या कामाबाबत उर्मिला मातोंडकर यांनी वाच्यता केली. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीकडून गेल्या वर्षात चांगलं काम केलंय असं मुद्दाम उर्मिला यांनी नमूद केलं. माझ्यावर शिवसेना पक्ष जॉईन करण्याची कोणतीही सक्ती नव्हती. मुळात मला काम करण्याची इच्छा आहे म्हणून मी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.
मी कंगनाच्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही
कंगनाला तुम्ही शिवसेनेत आल्यावर उत्तर देणार का असा प्रश्न देखील विचारला गेला. यावर उर्मिलाने शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मी कंगनाच्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही. कारण कंगनाच्या विषयावर खूप चर्चा आधीच झालेली आहे. आपण त्या विषयाला नको तितकं महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे मी त्या टीकेला उत्तर देणार नाही.
मुलींच्या प्रश्नांवर काम करायला आवडेल
शिवसेनेत प्रवेश केल्यावर आपल्याला महाराष्ट्रातील महिला आणि मुलींच्या प्रश्नांवर काम करायला आवडेल असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात.
मी तेंव्हाही राजकारण सोडलं नव्हतं
मी तेंव्हाही राजकारण सोडलं नव्हतं, आताही माझी तळागाळात जाऊन काम करण्याची इच्छा आहे. मी महाराष्ट्रातील जनतेकडून थोडा विश्वास आणि काळ मागतेय. मी माझ्या कामाने स्वतःला सिद्ध करेन असं मातोंडकर म्हणाल्यात
मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू
काँग्रेची विचारधारा सेक्युलर आणि शिवसेनेची हिंदुत्त्ववादी आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत कसा प्रवेश केला यावर उर्मिला म्हणाल्यात की, सेक्युकर शब्दाचा अर्थ म्हणजे इतर धर्माच्याकडे किंवा इतरांच्या धर्माला 'हेट' करणे नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू आहे. मी हिंदू धर्माबाबात अनेक तास बोलू शकते.
i want to become people made politician says urmila matondkar at his first press conference