घरातच रूग्णावर होऊ शकणार ICU स्तरावरील उपचार

कोरोना रूग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय
Medical-Treatment
Medical-Treatment

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रभाव प्रचंड वाढताना दिसतोय. त्यासाठी राज्यात लॉकडाउनसदृश नियमही लागू करण्यात आले आहेत. पण यादरम्यान मुंबईतील रुग्णालयेच आता व्हेंटीलेटरवर असल्याचं चित्र आहे. बुधवारी संध्याकाळी अवघे 15 व्हेंटीलेटर आणि 41 आयसीयू बेड्स रिक्त होते.तर, ऑक्सीजनचे 1 हजार 444 बेड्स रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडचे रुग्ण वाढत आहे तेवढ्याच प्रमाणात आयसीयू, व्हेंटीलेटरची गरज वाढत आहे. यावर उपाय म्हणून महानगर पालिकेने संबंधित रुग्णाच्या घरातच आयसीयू तयार करण्यास खासगी कंपनीला परवानगी दिली आहे. ही सुविधा सशुल्क असणार.

सध्या उपचार सुरु असलेले 1 हजार 294 रुग्ण अत्यावस्थ आहेत. मुंबईत 2 हजार 664 आयसीयू बेड उपलब्ध आहेत.त्यातील 2 हजार 623 बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत.तर,व्हेंटीलेटरचे 1 हजार 339 बेड्स असून त्यातील 1 हजार 324 बेड्सवर रुग्ण आहेत.अशी परीस्थीतीत सध्या मुंबईत आहे.बुधवारी संध्याकाळी महानगर पालिकेने ही माहिती नोंदवली आहे.सध्या 86 हजार 866 उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईत संध्याकाळपर्यंत फक्त 1 हजार 444 ऑक्सीजन बेड्स शिल्लक होते. 10 हजार 361 ऑक्सिजन बेड्स पैकी 8 हजार 917 बेड्स वर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. कोविडचा विषाणू श्‍वसनयंत्रणेवर हल्ला करत असल्याने रुग्णांमध्ये ऑक्सीजनची कमतरता होते. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था महत्त्वाची आहे.

पंचतारांकित हॉटेल मध्येही होणार विलगीकरण

लक्षण नसलेल्या तसेच सौम्य लक्षण असलेले रुग्णही खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे काही प्रकार लक्षात आले आहे.त्यामुळे अशा रुग्णांना आता पंचतारांकीत हॉटेल मध्ये विलगीकरणा राहून उपचार घेता येणार आहे.त्यासाठी पहिल्या टप्यात वांद्रे आणि नरीमन पॉईंट येथील दोन पंचतारांकीत रुग्णालयात प्रत्येकी 50 क्वारंटाईन बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्याच बरोबर ज्या रुग्णांमध्ये 10 दिवसाच्या उपचारांनंतरही कोविडची बाधा असेल अशांनाही या हॉटेल्स मध्ये दाखल होता येणार आहे.या रुग्णांना खासगी रुग्णालयांमार्फत उपचार करण्यात येणार आहे.

येत्या आठ दिवसात 500 आयसीयू बेड्सची होणार वाढ

येत्या चार दिवसात विविध ठिकाणी 200 आयसीयू व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तर,येत्या दोन दिवसात दहिसर केंद्रात 25, सेव्हन हिल्स रुग्णालयात 34 आणि कूपर मध्ये 40 आयसीयू बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तर,येत्या आठ दिवसात 300 आयसीयू बेड्स मिळणार आहेत.

(संपादन- विराज भागवत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com