आयडॉलच्या प्रथम वर्ष प्रवेशास सुरुवात; महाविद्यालय व आयडॉलचा अभ्यासक्रम एकच

तेजस वाघमारे
Tuesday, 10 November 2020

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार या वर्षी प्रथमच पदवी प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरू होत आहेत. त्यामुळे महाविद्यालय व आयडॉलचा अभ्यासक्रम एकच असणार आहे. याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. 

अर्णब गोस्वामी यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर मंगळवारी सुनावणी; पोलिसांना दररोज तीन तास चौकशीला परवानगी

आयडॉलचे प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास आजपासून सुरुवात झाली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी द्वितीय व तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्षाचे प्रवेश सुरू झाले होते. यामध्ये आजपर्यंत 30 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यूजीसीने वर्ष 2020-21 साठी 12 ऑक्‍टोबरला मान्यताप्राप्त विद्यापीठाची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यास परवानगी मिळाली. यानुसार मुंबई विद्यापीठ प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी आयडॉलमध्ये सर्व अभ्यासक्रम वार्षिक पद्धतीचे होते; परंतु आयडॉलमधील अभ्यासक्रम सत्र पद्धतीने चालवावेत, असे यूजीसीने निर्देश दिले आहेत. यानुसार या वर्षी प्रथमच पदवी प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमएस्सी गणित, आयटी व एमसीए हे अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरू होत आहेत. 

एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत "एन 95" मास्क विक्री बंद

विद्यार्थ्यांना दिलासा 
आता महाविद्यालय व आयडॉलचा अभ्यासक्रम एकच असणार आहे. यामुळे जे विद्यार्थी महाविद्यालयातून आयडॉलमध्ये किंवा आयडॉलमधून महाविद्यालयात पुढील वर्गात प्रवेश घेतात, अशा विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच आयडॉलच्या विद्यार्थ्यांनाही या सत्र पद्धतीचा फायदा होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idols first year of admission begins College and Idol curriculum is the same university of mumbai

टॉपिकस
Topic Tags: