आयडॉलच्या जानेवारी सत्रातील प्रवेशाला सुरुवात; पहिल्या दिवशी दीडशे जणांनी घेतला प्रवेश

तेजस वाघमारे
Tuesday, 19 January 2021

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दीडशेहून अधिक जणांनी प्रवेश घेतले असल्याची माहिती आयडॉलकडून देण्यात आली. 

मुंबई  : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास आजपासून (ता. 19) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दीडशेहून अधिक जणांनी प्रवेश घेतले असल्याची माहिती आयडॉलकडून देण्यात आली. 

कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आयडॉलचे प्रवेश उशिराने सुरू झाले होते. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी देण्यासाठी आयडॉलने नुकतीच पुरवणी परीक्षा घेतली होती. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बी.ए. किंवा बी.कॉम.च्या पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणे सुरू झाले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये बी.कॉम., एम. ए, एम. कॉम व एम. ए. शिक्षणशास्त्र आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे सुरू झाले आहे. आयडॉलची प्रवेश प्रक्रिया 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 2020 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलैबरोबरच जानेवारी सत्रातही प्रवेश देण्याची अनुमती दिली. त्यानुसार 2020 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही जानेवारी सत्राचे प्रवेश करण्यास मान्यता देण्यात आली. 2020 मध्ये 900 विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये जानेवारी सत्रात प्रवेश घेतला होता. 2020-21 शैक्षणिक वर्षाच्या जुलै सत्रामध्ये 59 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

जे विद्यार्थी बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील किंवा ज्यांना काही कारणामुळे जुलै सत्रात प्रवेश घेता आला नाही, त्यांच्यासाठी प्रवेशाची एक संधी असल्याचे आयडॉलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने असून विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा, असे आवाहन आयडॉलने केले आहे. 

आता आयडॉलमध्ये सेमिस्टर पद्धत 
आयडॉलमध्ये सेमिस्टर पद्धतीने अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जुलै- 2019 सत्रामध्ये सुरुवात झाली आहे. जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष बी.ए. आणि बी.कॉम.बरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एम.ए. व एम.कॉम.मध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात येत आहे. एम.ए.मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विषय असून मानव्य व सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयात प्रवेश घेता येईल. एम.कॉम.मध्येही अकाऊंट्‌स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. 

Idols January season entry begins One and a half hundred students took admission on the first day

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idols January season entry begins One and a half hundred students took admission on the first day