
शिंदेंनी कानात सांगितलं असतं तर...; अजित पवारांची सभागृहात फटकेबाजी
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज विधीमंडळात पार पडली. यावेळी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. यावेळी विधानसभेत आमदार अजित पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेनेचे आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आमदारांना उद्देशून फटकेबाजी केली. (If Eknath Shinde had told me in my ear then Ajit Pawar speaks in VidhanSabha)
हेही वाचा: वजीर, आत्मसन्मान मेला तर...; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
तत्पूर्वी अजित पवारांनी सभागृहात अनेक कोट्या केल्या. पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सांगितलं की, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील तेव्हा एकदम शांतता पसरली. कितीतरी भाजपचे लोक रडायलाच लागले. कोणाला काही कळेनाच, संपूर्ण महाराष्ट्राला तो शॉक होता. गिरीश महाज यांचं तर अजून रडणं बंद होत नाहीए. फेटा बांधायला दिला तर तो सोडून ते आपले डोळे पुसत आहेत. खरंतर त्यांना या घडामोडीचं खूपच वाईट वाटलंय.
हेही वाचा: देशानं या घटनेची नोंद घेतली; बंडावर मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले!
आज सभागृहात आपण सर्वजण असताना कोणी कितीही काही म्हटलं तरी सर्वांच्या मनात धाकधुक आहेच. आज भाजपचे १०५ आमदारांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन विचारावं की हे सगळं जे काही घडलंय त्यानं आपलं समाधान झालंय का? यावेळी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, तुम्ही बाकडं वाजवू नका, तुम्हालाच मंत्रीपद मिळतय की नाही सांगू शकत नाही. तसेच शिवसेनेतून गेलेल ४०-४५ लोक आहेत यांपैकी कोणाला मंत्रीपदं मिळतील सांगू शकत नाही. सगळ्यांना वाटतंय आपल्याला मिळेल पण मला सांगता येत नाही काय होईल ते.
तुम्ही माझ्या कानात सांगितलं असतं तर...
एकथान शिंदे आपण एकत्र काम केलेलं आहे. पण हे कशामुळं घडलं काय घडलं खरंतर तुम्ही माझ्या कानात सांगितलं असतं की, "अजित जरा उद्धवजींना सांग आत्ता मला द्या अडीज वर्षे झालीत" तर मीच सांगतो आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं. काही प्रॉब्लेमच आला नसता, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडं पाहून टोला लगावला.
Web Title: If Eknath Shinde Had Told Me In My Ear Then Ajit Pawar Speaks In Vidhansabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..