२० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळल्यास इमारत सिल; BMC चा निर्णय

BMC
BMCsakal media

मुंबई : इमारत, विंग मध्ये 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोविडबाधित (corona patients) रुग्ण आढळल्यास ती विंग, इमारत सिल (building seal) करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने (bmc) घेतला आहे. याबाबत आज मार्गदर्शन तत्वे (Guidlines) जाहीर करण्यात आली आहे. इमारतीच्या व्यवस्थापन मंडळाने या नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे. (If more than twenty percent patients found in building that place will be sealed by bmc)

BMC
नवी मुंबईची मेट्रो सुरु करा; एकनाथ शिंदें यांचे आदेश

इमारत, विंग सिल करण्याबाबत मार्च महिन्यात घेतलेला निर्णयात सुधारणा केली आहे. पुर्वी इमारतीत, विंग मध्ये 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यावर सील करण्यात येत होती. आता 20 टक्के घरात बाधीत आढळल्यावर इमारत सिल करण्यात येणार आहे. बाधीत व्यक्तीत लक्षणं असल्यास त्यांना 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

तर,लक्षणं नसलेल्या बाधीतांना ताप नसल्यास तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.त्याच बरोबर बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना सात दिवस विलगीकरणात राहायचे आहे.यात,पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांना कोविड चाचणी करुन घ्यायची आहे.असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विलगीकरणात असलेल्या कुटुंबियांना प्राथमिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची असून नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com