राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास रेल्वे तयार; नीट,जेईई विद्यार्थ्यांच्या प्रवासावरून श्रेयवादाची लढाई सुरू

प्रशांत कांबळे
Monday, 31 August 2020

मंगळवार पासून सुरू होणाऱ्या नीट, जेईई परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपनगरिय लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आमदार एॅड.आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली होती

मुंबई - मंगळवार पासून सुरू होणाऱ्या नीट, जेईई परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपनगरिय लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आमदार एॅड.आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान राज्य सरकारने यासंदर्भाती उपनगरीय सेवा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वेला दिल्यास रेल्वे यासाठी तयार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी शेलार यांना सांगितले आहे. त्यामूळे नीट, जेईई विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी लोकल प्रवासाच्या मुद्यावर पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कलगीतुरा दिसून येत आहे.

'खासगी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर रुग्णालय दरनियंत्रण प्रस्ताव रखडला'; भाजपची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

नीट, जेईई परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 2.2 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यातील सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून त्यांच्या परिक्षा प्रवेश पत्रावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे लेखी व दूरध्वनीवरुन केली.दूरध्वनीवरुन त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार त्यांनी तत्वतः परवानगी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

मात्र तसा प्रस्ताव राज्य शासनाने रेल्वेला सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील संबंधीत मंत्री, अधिकारी यांनी याबाबत प्रस्ताव तातडीने रेल्वे मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राव्दारे केली. ही परवानगी मिळाल्यास मुंबई उपनगरातील सुमारे 50, हजार विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांना सुरक्षित व वेळेत परिक्षेला पोहचता येईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे. 

 

नीट,जेईई परिक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उपनगरिय लोकल सेवेने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सुचना मध्य रेल्वेला प्राप्त झाल्या नाही.
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीएच्या परिक्षेसाठी जाऊ इच्छिनाऱ्या सर्व परिक्षार्थ्यांसाठी एसटीची विभाग निहाय व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहे. त्याशिवाय नीट आणि जेईई या परिक्षांचे वेळापत्रक अद्याप एसटीला प्राप्त झाले नाही. तसे वेळापत्रक आल्यास एसटीचे नियोजन केल्या जाणार आहे. 
- अभिजीत भोसले,
जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the state government proposes, the railways will be ready, thanks to the travel of JEE students